‘व्हीआयपी कल्चर’च्या नावाखाली मुंबईत वाहतुकीचा खेळखंडाेबा..!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 06:21 AM2022-12-13T06:21:40+5:302022-12-13T06:21:50+5:30

वाहतूककोंडी झाली की लोक वैतागतात, चरफडतात, गर्दीत गपगुमान बसून राहतात

In the name of 'VIP culture', the traffic in Mumbai became worst | ‘व्हीआयपी कल्चर’च्या नावाखाली मुंबईत वाहतुकीचा खेळखंडाेबा..!

‘व्हीआयपी कल्चर’च्या नावाखाली मुंबईत वाहतुकीचा खेळखंडाेबा..!

googlenewsNext

- मनोज गडनीस
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गाडीवरचा लाल दिवा काढला असला तरी बिना दिव्याच्या गाड्या घेऊन फिरणाऱ्या व्हीआयपींनी मुंबईकरांचा रोजच छळ मांडला आहे. कधी झेड प्लसवाले मंत्री, अधिकारी, नेते आणि आता तर वाय सुरक्षा घेऊन फिरणारे ४० आमदार... लोक या व्हीआयपी कल्चरला वैतागले आहेत. ट्रॅफिक कोंडी झाली की लोक वैतागतात. चरफडतात. पण त्यांच्या हाती त्या गर्दीत गपगुमान बसण्यापलीकडे काहीही उरत नाही. त्यामुळे मुंबईत वाहतूककोंडी करणाऱ्या व्हीआयपींची कायमची काहीतरी सोय लावा असे आता लोक वैतागून बोलत आहेत.

मंत्रालयामुळे बहुतांश मंत्र्यांचा वावर मुंबईत आहे. त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री किंवा अन्य प्रमुख नेते, अलीकडच्या काळात वाय सुरक्षा मिळालेले आमदार यांच्या वाहनाचा ताफा देखील मोठा झाला आहे. 
एका नेत्याची गाडी, त्याच्या मागेपुढे पायलट गाडी, एक-दोन अधिकारी अथवा कार्यकर्त्यांच्या गाड्या. यामुळे सरासरी तीन ते पाच गाड्या एका व्हीआयपीच्या ताफ्यात असतात. खुद्द मंत्र्याच्या गाडीवरचा लाल दिवा जरी काढला असला तरी, पायलट गाडीवरचा अंबर दिवा झळकतच असतोच.
व्हीआयपी गाडीला असा प्राधान्याने रस्ता देण्याची तरतूद कोणत्या नियमात आहे हा जरी संशोधनाचा विषय असला तरी, होणाºया वाहतूककोंडीचा त्रास सामान्य प्रवाशांना होत आहे. 

व्हीआयपींच्या रोजच्या प्रवासासोबत मुंबईत देशाचे प्रमुख नेते किंवा आंतरराष्ट्रीय नेते आले की ही कोंडी आणखी वाढते. अशा वेळी वाहतूक बराच वेळ थांबवली जाते. या सगळ्याचा परिणाम लोकांचा वेळ, पेट्रोल, डिझेल वाया जाण्यात होत आहे.

लोकमतचे आवाहन
वाहतूककोंडीवर आपल्या विधायक सूचना असल्या तर आम्हाला कळवा. आम्ही त्या ‘लोकमत’च्या माध्यमातून सरकारपर्यंत पोहाेचवू. आम्ही या विषयावर प्रकाशित करत असलेल्या बातम्या आपण (#SaveTimeSaveFuel_Lokmat_initiative) हा हॅश टॅग वापरून ट्वीट करा. त्यातून या कोंडीवर मार्ग 
निघाला तर मुंबईकरांना हवाच आहे.

अशी हाेते काेंडी
nकोणत्याही गर्दीच्या वेळी रस्त्यावरून असा व्हीआयपी ताफा जातो, त्यावेळी त्या ताफ्याला कोंडीतून मार्ग काढून देण्याकडे वाहतूक पोलिसांचा कल असतो. 
nतसेच या ताफ्यातील गाड्याही जोरात हॉर्न वाजवत रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य वाहकाला गाडी बाजूस घेण्याची सूचना देत असतात. 
nअशा वेळी एका लयीत अन् रेषेत चालणारी सामान्य माणसाची गाडी वेग कमी करून डाव्या बाजूला सरकून मागील व्हीआयपी गाडीला मार्ग काढून देते.  

व्हीआयपी व्यक्तींच्या सुरक्षेशी निगडित काही प्रश्न असतात. त्यामुळे त्यांना प्राधान्य दिले जाते. पण तरीही सामान्य प्रवाशांना त्याचा त्रास होऊ नये, याची दक्षता आम्ही घेत असतो. काही अतिमहत्त्वाच्या व्यक्ती मुंबईत येतात. त्यावेळी सामान्य लोकांना त्रास होऊ नये याकरिता वाहतुकीच्या सर्व सूचना आगाऊ जारी केल्या जातात.      - राज तिलक रौशन, 
    पोलिस उपायुक्त, वाहतूक विभाग

Web Title: In the name of 'VIP culture', the traffic in Mumbai became worst

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.