Join us

नव्या वर्षात पाहा उल्का वर्षाव, सुपरमून, ग्रहांचा मिलाफ!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2023 10:10 AM

सरते वर्षे खगोलीय घटनांनी उजळले असतानाच आता खगोलप्रेमींना नव्या वर्षातही उल्कावर्षाव, चंद्र आणि ग्रहांची युती, धूमकेतू पाहता येणार आहेत.

मुंबई : सरते वर्षे खगोलीय घटनांनी उजळले असतानाच आता खगोलप्रेमींना नव्या वर्षातही उल्कावर्षाव, चंद्र आणि ग्रहांची युती, धूमकेतू पाहता येणार आहेत. यातील बहुतांशी घटना या दुर्बिणीसह साध्या डोळ्यांनी पाहता येणार आहेत. त्यामुळे नागरिकांना नव्या वर्षात वैज्ञानिक घटनांचा आनंद घ्यावा, असे आवाहन खगोल अभ्यासकांनी केले आहे.

अवकाशातील खगोल घटना अतिशय सुंदर; परंतु दरवर्षी वेगवेगळ्या असतात. नव्या वर्षात येणाऱ्या घटनासुद्धा अशाच मनमोहक असणार आहेत. नवीन वर्षात धूमकेतू आणि उल्का वर्षाव, ग्रह दर्शन आणि युती - प्रतियुती, पिधान, पौर्णिमा, ब्लूमून, सुपरमून आणि सूर्य आणि चंद्र ग्रहणे पाहण्यास मिळणार आहेत.- प्रा. सुरेश चोपणे, खगोल अभ्यासक

चंद्र-ग्रहांची युती :

चंद्र आणि ग्रहांची युती या नियमित दिसणाऱ्या घटना आहेत. परंतु अगदी जवळून घडणाऱ्या युती मात्र दुर्लभ असतात. बहुतेक युती चंद्रासोबत दिसतात. प्रतियुती मात्र बाह्यग्रहांच्या बाबतीत घडतात. त्यात तेजस्वी दिसणाऱ्या गुरु आणि शनी ग्रहाचीच युती मनोहारी असते.

६ एप्रिल : चंद्र - शनी युती ४ मे : शनी - चंद्र युती २७ जून : चंद्र - शनी युती  २४ जुलै : चंद्र - शनी युती८ सप्टेंबर : शनी - पृथ्वी - सूर्य एका रेषेत -  पृथ्वीच्या जवळ   १४ ऑक्टोबर : चंद्र - शनी युती ११ नोव्हेंबर : चंद्र - शनी युती७ डिसेंबर : सूर्य - पृथ्वी - गुरु एका रेषेत - पृथ्वीच्या जवळ  १८ डिसेंबर : चंद्र - मंगल युती 

सुपरब्लू मून :

पौर्णिमा दर महिन्याला घडणारी घटना असली तरी प्रत्येक पौर्णिमा ही सारखी नसते. कधी चंद्र लहान, तर कधी तो खूप मोठा दिसतो. ब्लू मूनला चंद्र निळा दिसत नसून एकाच महिन्यातील दुसऱ्या पौर्णिमेला ब्लू मून म्हणतात. सुपरमून हा पृथ्वीच्या जवळ असणाऱ्या आणि मोठा चंद्र दिसणाऱ्या पौर्णिमेला म्हणतात.

१९ ऑगस्ट : सुपरब्लू मून १८ सप्टेंबर : सुपरमून  १७ ऑक्टोबर : सुपरमून  १५ नोव्हेंबर : सुपरमून 

पॅनस्टार्स :

१० धूमकेतू सूर्याच्या जवळ येत असले तरी काही धूमकेतू पृथ्वीच्या थोडे जवळ येतील. तेव्हा ते साध्या दुर्बिणीने किंवा द्विनेत्रीने बघण्याची संधी आहे. यातील २ धूमकेतू साध्या डोळ्याने दिसण्याची शक्यता आहे. १४ फेब्रुवारी : पॅनस्टार्स (सकाळी) १४ मार्च : पॅनस्टार्स (सकाळी) जाने-मार्च : पॉन्स ब्रुक (सायंकाळी)२७ सप्टेंबर : (सायंकाळी)१२ ऑक्टोबर : ॲटलास /(सायंकाळी)

भारतातून दिसणारे उल्का वर्षाव :

३-४ जानेवारी : क्वान्द्रांटीडस  २२ एप्रिल : लायरीड्स २८-२९ जुलै : डेल्टा अक्वारीस १२-१३ ऑगस्ट : पर्सिड ७-८ ऑक्टोबर : द्राकोनीड्स १० ऑक्टोबर : साउथ टाँरीड २१-२२ ऑक्टोबर : ओरिओनीड्स ४-५ नोव्हेंबर : नॉर्थ टाँरीड १७-१८ नोव्हेंबर : लिओनीड १३-१४ डिसेंबर : जेमिनिड २१-२२ डिसेंबर : उर्सिड

टॅग्स :मुंबई