मुंबई : एमएमआरडीएने २०२४ च्या सुरुवातीपर्यंत मेट्रो मार्ग उभारणी प्रकल्पातील मोठा पल्ला पार केला आहे. मेट्रो मार्गांच्या एकत्रित प्रगतीमुळे महामुंबई मेट्रोचे जाळे अधिक विस्तारणार आहे. त्याचा फायदा लाखो प्रवाशांना होईल.
मेट्रो प्रकल्पांमुळे येणाऱ्या वर्षात एमएमआर क्षेत्रातील वाहतूक पायाभूत सुविधा अधिक बळकट होईल, असा विश्वास एमएमआरडीएने व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन केल्यानंतर मुंबई महानगर प्रदेशात काम सुरू असलेले मेट्रोचे प्रकल्प पुन्हा एकदा निवडणुकीच्या निमित्ताने चर्चेत आले आहेत. हे मेट्रोचे प्रकल्प नेमके काय आहेत, ते जाणून घेऊया.
सुरक्षित, सुखकर प्रवास करणे शक्यमेट्रो लाईन्स १, २ अ आणि ७ सध्या कार्यरत आहेत. ज्यामुळे मुंबईकरांच्या गरजा पूर्ण करतानाच त्यांना सुरक्षित, सुखकर प्रवास करणे शक्य झाले आहे. इतर मेट्रो मार्गदेखील पूर्णत्वाच्या दिशेने वेगाने मार्गक्रमण करत आहेत.
मेट्रो २ ब मेट्रो लाईन २ ब चा मार्ग हा २३.६४३ किमीचा आहे. डीएन नगर ते मंडाळे असा हा मार्ग आहे. २० स्थानके आहेत. रोजगाराच्या ३३८० नवीन संधी. ६ ट्रेन सेट्स दाखल झाले आहेत.
लाईन्स ४ आणि ४ अ एकूण लांबी ३५.२ किमी मेट्रो लाइन ४ वडाळ्यापासून सुरू होते. मेट्रो लाइन ४ अ कासारवडवली ते गायमुखपर्यंत आहे.
मेट्रो ५ मेट्रो लाईन ५ चा पहिला टप्पा ठाणे ते भिवंडी आहे. ११.८ किमीचा उन्नत मार्ग आहे. ६ स्थानके आहेत. पहिल्या टप्प्याचे काम पूर्णत्वाच्या दिशेने.
मेट्रो ६ मेट्रो लाईन ६ हा उन्नत मार्ग आहे. मार्गाची लांबी १५.३१ किमी आहे. स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी दरम्यानचा हा मार्ग आहे. मार्गावर १३ स्थानके आहेत.
मेट्रो ७,७ अ मेट्रो लाईन ७ ही प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. मार्गावरील ०.९२४ किमीचा उन्नत स्वरुपाचा आहे. २.५ किमीचा भाग भूमिगत दुहेरी-बोगदा प्रणालीने जोडणारा आहे.
मेट्रो ९ मेट्रो ९ हा मेट्रो लाईन ७ चा उत्तरेकडील विस्तारित भाग म्हणून ओळखला जातो. दहिसर पूर्व ते मीरा भाईंदरला जोडणारी ही मेट्रो आहे. मार्गावर ८ स्थानके आहेत.
मेट्रो १२ मेट्रो लाईन १२ ही कल्याण ते तळोजा दरम्यान आहे. मेट्रोला पर्यावरणाशी निगडित मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मार्गावरील स्थानके आणि व्हायाडक्टच्या बांधकामासाठी निविदा प्राप्त झाल्या आहेत.