Join us

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकावर गर्दी, प्लॅटफॉर्म तिकीट पाचपट महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2022 11:25 PM

दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी होत आहे. गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई :

दिवाळीच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर गर्दी होत आहे. गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेने ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. ही दरवाढ उद्यापासून म्हणजेच २२ ऑक्टोबर २०२२ पासून ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यानच्या १० दिवसांसाठी केली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटांची किंमत १० रुपयांऐवजी ५० रुपये इतकी असणार आहे.

टॅग्स :मुंबई लोकल