Join us  

"आघाडीमुळे ताकद वाढेलच असे नाही कारण...", अखिलेश यादवांचा कार्यकर्त्यांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2023 5:16 PM

Lok Sabha Election 2024 : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला आहे. 

Akhilesh Yadav Mumbai Visit : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपला रोखण्यासाठी विरोधकांनी एकजुटीचा नारा दिला आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील पक्षांची प्रमुख भूमिका असणार आहे. कारण लोकसभेच्या ८० जागा असलेले हे राज्य देशातील सत्तेचा मार्ग ठरवते. उत्तर प्रदेशातील सर्वच पक्ष 'मिशन २४' साठी नवीन रणनीती बनवत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी पक्ष भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधी पक्ष कामाला लागल्याचे दिसते. 

दरम्यान, उत्तर प्रदेशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादवमुंबई दौऱ्यावर असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अखिलेश यादव २०२४ मध्ये स्वत:ला विरोधी पक्षाचा चेहरा मानतात का? असे विचारले असता ते म्हणाले की, आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, वेळ आल्यावर आम्ही निर्णय घेऊ. यादव यांचे हातवारे पाहून पत्रकारांमध्ये हशा पिकला. 

"आघाडीमुळे ताकद वाढेलच असे नाही"तसेच आघाडीमुळे पक्षाची ताकद वाढेलच असे नाही कारण कधी कधी ताकद कमी देखील होते. लोकशाहीत लोकांची ताकद जास्त महत्त्वाची असते. सत्ताधारी भाजपची काय रणनीती आहे, कधी-कधी कोणाला काहीच समजत नाही. भाजप समाजाला तोडण्याचे काम करत असून फूट फाडण्याची त्यांची वृत्ती आहे, अशी टीकाही अखिलेश यादव यांनी केली. 

टॅग्स :अखिलेश यादवलोकसभासमाजवादी पार्टीभाजपामुंबई