Join us

तीन महिन्यांत यूट्यूबने हटवले २२ लाख प्रक्षोभक व्हिडिओ; इशान चॅटर्जी यांनी दिली माहिती

By मनोज गडनीस | Published: April 08, 2024 5:43 PM

सॉफ्टवेअरच्या मदतीने व्हिडिओ हटवले.

मनोज गडनीस, मुंबई :  गेल्यावर्षीच्या ऑक्टोबर ते डिसेंबर अशा तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये सादर करण्यात आलेले तब्बल २२ लाख ५० हजार प्रक्षोभक व्हिडिओ यू-ट्यूबने हटवले आहेत. यू-ट्यूबचे भारतातील संचालक इशान चॅटर्जी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चॅटर्जी म्हणाले की, सध्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे अनेक राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते, सामान्य माणसे मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर निवडणुकांविषयीची माहिती घेत आहेत. अशावेळी यू-ट्यूब सारख्या प्रमुख माध्यमावरून लोकांपर्यंत चुकीची, खोटी तसेच बदनामकारक माहितीचे प्रसारण होऊ नये म्हणून यू-ट्यूबने विशेष काळजी घेत आपले धोरण अधिक कडक केले आहे. 

याच पार्श्वभूमीवर ऑक्टोबर ते डिसेंबर अशा तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये भारतामधून अपलोड करण्यात आलेले २२ लाख ५० हजार व्हीडीओ आम्ही आमच्या व्यासपीठावरून हटवले आहेत. एखादा व्हीडीओ प्रक्षोभक, वादग्रस्त आहे की नाही हे ओळखण्यासाठी सॉफ्टवेअर तसेच आर्टिफिशियल तंत्रज्ञानाचा देखील कंपनी मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे. त्यामुळेच जे साडे बावीस लाख व्हीडीओ हटविण्यात आले त्यापैकी ९६ टक्के व्हीडीओ हे प्रक्षोभक किंवा कंपनीने निश्चित केलेल्या धोरणानुसार नसल्याचे तंत्रज्ञानाद्वारे उघड झाले आहे.

टॅग्स :मुंबई