मुंबई : गुंगीचा पदार्थ मिसळलेले शितपेय पाजून बेशुद्धावस्थेत असलेल्या विवाहितेवर बलात्कार करून तिची अश्लील छायाचित्रे काढणा-या आरोपी अतुल कदम याने पुढील काळात शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेची अश्लील छायाचित्रे ती राहत असलेल्या परिसरातील नागरिकांना दाखवून बदनामी केल्याचे चौकशीत आढळले आहे.बलात्काराचे चित्रीकरण करून ते प्रसारित करण्याची धमकी देत ब्लॅकमेल केल्याच्या आरोपावरून अतुल कदम या मेकअप आर्टिस्टविरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने आरोपीने आपली अश्लील छायाचित्रे नातेवाइकांना पाठवल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.बलात्कारानंतर मोबाइलमधील अश्लील छायाचित्रे आणि चित्रीकरण दाखवून आरोपीने बळजबरीने शरीरसंबंध ठेवण्यासाठी दबाव आणू लागला. त्याला विरोध केला असता अश्लील छायाचित्रे सासू - सासरे तसेच मित्रमैत्रिणींना पाठवली. इतकेच नव्हे तर आपल्याला बदनाम करण्यासाठी मद्याच्या नशेत असलेल्या आरोपीने २३ एप्रिल २0१७ रोजी आपण राहत असलेल्या मालाड (पश्चिम) परिसरात येऊन आपल्या शेजाºयांनाही अश्लील छायाचित्रे दाखवली होती. त्यामुळे मालाड पोलिसांना पाचारण करण्यात आले होते. या प्रकारामुळे नैराश्य आलेल्या आपल्या पतीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता.या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती, असे महिलेने पोलिसांना सांगितले. गोरेगाव फिल्म इंडस्ट्रीत हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करणाºया पीडित महिलेची रिअॅलिटी शोच्या सेटवर आरोपीसोबत ओळख झाली होती. कामाच्या निमित्ताने २७ फेब्रुवारी २0१४ रोजी आरोपीने त्याच्या गोरेगाव (पूर्व) येथील नागरी निवारा परिषदेतील घरी बोलावले आणि शितपेयात गुंगीचा पदार्थ मिसळून बेशुद्धावस्थेत असताना बलात्कार केला, अशी पीडितेची तक्रार आहे.
बलात्कारातील आरोपीकडून सार्वजनिक ठिकाणी महिलेची बदनामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2017 7:17 AM