लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बोरिवली पश्चिमेतील आयसी कॉलनी प्रभाग क्रमांक १ येथील काेविड लसीकरण केंद्राचे उद्घाटन साेमवारी शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती डॉ. विनोद घोसाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शिवसेना नगरसेविका तेजस्वी अभिषेक घोसाळकर यांच्या प्रयत्नाने सदर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. आता प्रभागात लसीकरण केंद्र सुरू झाल्याने नागरिकांची लसीकरणासाठीची साेय प्रभागातच झाली आहे. सध्या हे लसीकरण केंद्र फक्त ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी असून दरदिवशी १०० नागरिकांचे लसीकरण होईल, अशी माहिती घोसाळकर यांनी दिली.
याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख व आमदार विलास पोतनीस, महिला संघटक सुजाता शिंगाडे, कर्णा अमिन, बाळकृष्ण ढमाले, माजी नगरसेवक-मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर, शकुंतला शेलार, पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार, आर उत्तर वॉर्डच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश वायदंडे, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, महिला शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा, युवा सेनेचे दर्शित कोरगावकर, जितेंन परमार उपस्थित होते.
......................................