मुंबई : कोविड साथीच्या काळात रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी मुंबई काँग्रेसतर्फे गुरूवारी दुसऱ्या हाॅटलाईन सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. शिवाजीनगर, मानखुर्द येथील या सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, जिल्हाध्यक्ष इब्राहम रॉय मोनि सरचिटणीस वासीम जावेद खान उपस्थित होते.
याबाबत अधिक माहिती सांगताना भाई जगताप म्हणाले की, या कोविड हॉटलाईन सेंटरच्या माध्यमातून हेल्पलाईनद्वारे कोविड रुग्णांना हॉस्पिटल्समध्ये बेड्सची, ऑक्सिजन, इंजेक्शन्स व ॲम्ब्युलन्सच्या उपलब्धतेची सर्व माहिती मिळू शकणार आहे. तसेच या सेवेमुळे गंभीर स्थितीत असणाऱ्या कोविड रुग्णांना वेळीच योग्य ती मदत पोहचवणे शक्य होणार आहे. तसेच या कोविड हॉटलाईन सेंटरच्या माध्यमातून मुंबई शहरांत बेड्स, ॲम्ब्युलन्स व ऑक्सिजनच्या उपलब्धता सोबत रुग्णालयांत मिळणाऱ्या ट्रिटमेंटची माहिती, तसेच कोविडसाठी रेमडेसिविर, फॅबीफ्लू अशा अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धता संबंधी माहिती मिळू शकेल, असे भाई जगताप यांनी सांगितले.