मुंबई- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या दिंडोशी विधानसभा निवडणूक मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते, विभागप्रमुख आमदार सुनिल प्रभू यांच्या शुभहस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजित रावराणेआणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज सकाळी करण्यात आले.
मालाड (पूर्व ),कुरार गाव, हवाहिरा पार्क जमजम बेकरी जवळ हे निवडणूक कार्यालय उघडले आहे.अमोल कीर्तिकर यांनी उपस्थित राहून उपस्थित पदाधिकारी व सहकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी शिवसेना विधानसभा संगठक प्रशांत कदम , माजी उपमहापौर अँड.सुहास वाडकर,उत्तर भारतीय एकता मंच राष्ट्रीय संगठक अशोक तिवारी, सीमा सिंह, जयकांत शुक्ला, संतोष सिंह , आपचे अरुण यादव, इरफान खान, समाजवादीचे अरुण यादव, सिपीएम चे राजेश आर्या तसेच महाविकास - इंडिया आघाडीचे मान्यवर नेते व दिंडोशी विधानसभेचे सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.