Join us

महाराष्ट्राला भूरळ घालणारे बाळासाहेब ठाकरे; आशिष शेलारांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यानाचे लोकार्पण

By मनोहर कुंभेजकर | Published: January 22, 2023 8:48 PM

१५ एकर जागेत बाळासाहेब ठाकरे मनोरंजन मैदान बोरॉवली पश्चिन चिकू वाडीत साकारून मैदानाला त्यांचे नाव दिल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

मुंबई- ज्यांनी आपल्या ओजस्वी वक्तृत्वाने लाखोंच्या सभेने मैदाने गाजवली. अशा महाराष्ट्राचे नेतृत्व करून महाराष्ट्राला भूरळ घालणारे बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे नेतृत्व होते. खेळावर,क्रिकेटवर प्रेम करणारे असे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे थोर व्यक्तीमत्व होते. १५ एकर जागेत बाळासाहेब ठाकरे मनोरंजन मैदान बोरॉवली पश्चिन चिकू वाडीत साकारून मैदानाला त्यांचे नाव दिल्याबद्धल खासदार गोपाळ शेट्टी यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

नागरिकांना न्याय मिळण्यासाठी लढणारे, मुंबईत जास्तीत जास्त मोकळ्या जागा वाचल्या पाहिजे म्हणून लढा देणारे,आणि बोरीवलीत सर्वात जास्त उद्याने उभारली असे मुंबईचा वाली कोण आहे तर खासदार गोपाळ शेट्टी आहेत, अशा शब्दात आशिष शेलार यांनी त्यांचा गौरव केला. तर, उपनगर पालकमंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, शेवटच्या माणसाच्या न्याय व हक्कासाठी लढणारे असे खासदार गोपाळ शेट्टी यांचे कर्तृत्व आहे. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी शिवसेनाप्रमुखांनी आपले जीवन त्यांनी खर्च केले.त्यांच्या नावाने १५ एकर जागेत सदर उद्यान त्यांनी साकारले आहे.या उद्यानाच्या विकासासाठी पैसा कमी पडू दिला जाणार नाही.येत्या ७ दिवसात निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली चांगले काम राज्यात सुरू असून आगामी काळात जनतेचे राज्य मुंबईत आणण्याचे त्यांनी आवाहन केले.याच कार्यक्रमात खासदार गोपाळ शेट्टी यांचा भव्य सत्कार गावदेवी ग्रामस्थ मंडळ,भारतीय जनता पार्टी तसेच पालकमंत्री.मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते  करण्यात आला. यावेळी मंचकावर विधानपरिषदेचे भाजप गटनेते प्रवीण दरेकर,आमदार योगेश सागर,बोरीवलीचे स्थानिक आमदार सुनील राणे,आमदार प्रकाश सुर्वे,शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे, भाजप जिल्हाध्यक्ष गणेश खणकर,विनोद शेलार,दिलीप पंडित,अँड.जे.पी.मिश्रा  आणि इतर मान्यवर आणि नागरिक व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

असे आहे बाळासाहेब ठाकरे मनोरंजन उद्यान

शिलालेख,किड्स झोन,जॉगिंग ट्रॅक,बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रवेशद्वार, खो खो,कब्बडी,व्हॉलीबॉल,बास्केटबॉल,मल्लखांब,क्रिकेट, लॉन टेनिस इत्यादी खेळांच्या मैदाने.या मनोरंजन मैदानावर १ किलोमीटर लांबीचा  जॉगिंग ट्रॅक असून दुतर्फा शोभिवंत झाडे लावली असून संपूर्ण ट्रॅक वर  मनोरंजनासाठी स्पीकर्स मधून गाण्यांचा आस्वाद घेता येतो. कार्यकर्त्यांनी अगदी कमी वेळात या कार्यक्रमाचे शिवधनुष्य पेलले या बद्दल सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार आणि सन्मान केला.या कार्यक्रमाचे नियोजन दिलीप पंडित यांनी केले असून महेश राऊत,दीपक पाटणेकर ,राजेश भट्ट,शरद साटम,नितीन प्रधान,हनुमान मेकला,मायशंकर चौबे,रामशंकर मौर्य,गणेश बारे  यांचाही सत्कार करण्यात आला.

टॅग्स :आशीष शेलारभाजपागोपाळ शेट्टीबाळासाहेब ठाकरे