Join us  

धनकुंवरबेन बाबुभाई धकाण रुग्णालयाचे मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन 

By मनोहर कुंभेजकर | Published: July 23, 2023 6:35 PM

रमाबेन प्रविणभाई धकाण कार्डियाक केंद्राच्या नवीन इमारतीचेही उद्घाटन यावेळी करण्यात आले. 

मुंबई : पश्चिम उपनगरातील बोरिवली इथं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते सुवर्ण चॅरिटेबल ट्रस्टचे  धनकुंवरबेन बाबुभाई धकाण रुग्णालयाचे  आणि रमाबेन प्रविणभाई धकाण कार्डियाक केंद्राच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. 

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष अॅड.राहुल नार्वेकर, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, स्थानिक खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष, आमदार   अँड आशिष शेलार,  आमदार योगेश सागर, आमदार सुनिल राणे, आमदार मनिषा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘ दृश्य हे चिरस्थायी  असतं, जे दिसतं त्याच्यामागे त्याला स्थायित्व देणारा भाव मूळ संवेदनाचा आणि मनाचा भाव आहे. हे मनुष्याचे विशेष आहे. प्राण्यात हे दिसतं नाही. मनुष्य दुसऱ्याचे दु:ख पाहून शांत नाही राहू शकत. तो काही तरी करतो, उघड्या डोळ्यांनी तो जगाचे दु:ख पाहू शकत नाही.’ असा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी यावेळी मांडले.

‘सुसज्ज अत्याधुनिक सुविधा आणि  आवश्यक असलेली यंत्रसामुग्री रुग्णालयात पाहता आली. विशेषत: रुग्णालयात तयार करण्यात आलेला  शस्त्रक्रिया विभाग अत्याधुनिक आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे गरीबातला गरीब रुग्णाच्या विभागाची व्यवस्थाही  वातानुकूलित केली आहे. तिथली व्यवस्था आणि सुविधाही चांगल्या प्रकारे करण्यात आली आहे. चॅरिटेबल रुग्णालयात कोणीही व्यक्ती आली. त्याची आर्थिक स्थिती कशीही असली, गरीब, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत असो. सर्वांना उपचार एकाच पद्धतीनं मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. सुवर्ण चॅरिटेबल ट्रस्टचा प्रवास लहान रुग्णालय, लहान डायलिसीस केंद्र  त्यानंतर २०१९ नंतर १४० खाटांचं अत्याधुनिक रुग्णालय तयार करण्यात येईल, एक मोठी जबाबदारी होती. त्याविषयी आमदार योगेश सागर माझ्याशी चर्चा करायचे.या हॉस्पिटलच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. एक स्वयंसेवक कसा असतो, तर तो त्यांच्या सारखा असतो. समर्पण वृत्तीने त्यांनी रुग्णालय उभारलं,’ अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या. 

टॅग्स :मोहन भागवतहॉस्पिटलदेवेंद्र फडणवीस