मुंबई : गोखले पुलाचा एक भाग पूर्ण झाला असला तरी बेकायदा मुख्यमंत्र्यांना उद्घाटनासाठी वेळ नसल्याने हा भाग खुला केला जात नाही, असा आरोप शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. गोखले पुलाचा पूर्ण झालेला भाग वाहतुकीसाठी खुला कधी होणार याविषयी संदिग्धता आहे. महापालिकेकडूनही निश्चित तारीख घोषित झालेली नाही. या पार्शवभूमीवर पुलाचा एक भाग शुक्रवारी रात्रीच वापरासाठी तयार झाला आहे, आहे, असे ‘एक्स’ आदित्य यांनी केले आहे.
बेकायदा मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने आणि सत्ताधारी पक्षाचे स्थानिक राजकारणी राजकारण करत असल्याने पुलाचा भाग वाहतुकीसाठी खुला होत नाही. पुलाचा छोटा भाग सुरु करण्यासाठी उद्गाटनाचा घाट का घातला जात आहे, विनाकारण उशीर का केला जात आहे, असा सवालही आदित्य यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना वेळ असेल तर बहुधा सोमवारी या भागाचे उदघाटन होईल, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्याने तयार भागाची साफसफाई करू नये, डेब्रिज आहे तिथेच राहू द्या, जेणेकरून पूल अजून तयार नाही असे भासवण्यात येईल, त्या दृष्टीने सूचना देण्यात आल्याचा दावाही त्यांनी ‘एक्स’ वर केला.
तुळई तयार करण्यास २० दिवसांचा विलंबगोखले पूल ७ नोव्हेंबर २०२३ पासून पुनर्रबांधणीसाठी बंद करण्यात आला पुलाच्या कामाला १ एप्रिल २०२३ पासून सुरुवात झाली. या पुलासाठी लोखंडी तूळया अंबाला येथील फॅब्रिकेशन कारखान्यातुन मागवण्यात आल्या होत्या. या कारखान्यात अतिवृष्टीमुळे पाणी भरल्याने तुळई तयार करण्यास १५ ते २० दिवसांचा विलंब झाला. तुळईचे सुटे भाग प्रत्यक्ष बांधकामस्थळी आणून जून २०२३ मध्ये तुळई जुळवण्याची काम सुरु झाले. पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम फेब्रुवारीच्या शेवटच्या आठड्यापर्यंत पूर्ण करा, असे निर्देश पालिका आयुक्तांनी याच आठवड्यात दिले होते