‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे लोकार्पण; प्रमुख ९ जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा, सुविधांचा विकास करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2023 07:17 AM2023-01-08T07:17:45+5:302023-01-08T07:18:12+5:30

महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी म्हणाले की, जैन समाजाचे योगदान फार मोठे आहे.

Inauguration of 'Pavitra Jain Pilgrimage Circuit'; 9 will develop the security and facilities of Jain pilgrimage sites | ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे लोकार्पण; प्रमुख ९ जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा, सुविधांचा विकास करणार

‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे लोकार्पण; प्रमुख ९ जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा, सुविधांचा विकास करणार

googlenewsNext

मुंबई : राज्यातील पवित्र जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा तसेच तेथील सुविधांच्या विकासासाठी ‘पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किट’चे लोकार्पण शनिवारी राजभवन येथे  विशेष कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी यांच्या हस्ते तसेच मुमुक्षरत्न श्री सेतुकभाई अनिलभाई शाह व पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. याअंतर्गत राज्यातील प्रमुख ९ जैन तीर्थक्षेत्रांची सुरक्षा तसेच तेथील सुविधांच्या विकासासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

पवित्र जैन तीर्थदर्शनच्या माध्यमातून सटाणा (जि. नाशिक) येथील श्री मांगी तुंगीजी दिगंबर जैन सिद्ध क्षेत्र देवस्थान, शहापूर (जि. ठाणे) येथील मानसमंदिर (शाहपूर जैन तीर्थ), साक्री (जि. धुळे) येथील श्री बलसाना श्वेतांबर जैन तीर्थ, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील श्री जगवल्लभ पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, पी. ओ.- बाहुबली (जि. कोल्हापूर) येथील कुम्भोज बाहुबली जैन मंदिर, वणी (ता. दिंडोरी, जि. नाशिक) येथील श्री अमिझरा शंखेश्वर पार्श्वाभ्युदय तीर्थ, पाबळ (ता. शिरुर, जि. पुणे) येथील पद्म आणि जैन तीर्थ, पायधुनी (मुंबई) येथील श्री गोडीजी पार्श्वनाथ तीर्थ, शिरपूर (ता. मालेगाव, जि. वाशिम) येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवान या तीर्थस्थळांचा  विकास करण्यात येणार आहे. 
राजभवन येथे झालेल्या या कार्यक्रमास पर्यटन विभागाचे सचिव सौरभ विजय, एमटीडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी, हिरे व्यावसायिक सेवंतीभाई यांच्यासह जैन समाजबांधव उपस्थित होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी पर्यटन विभागामार्फत पवित्र जैन तीर्थदर्शन सर्किटच्या माध्यमातून या तीर्थक्षेत्रांच्या सुरक्षा आणि सुविधांसाठी हाती घेण्यात आलेला कार्यक्रम स्तुत्य आहे. अध्यात्माचे महत्त्व लक्षात घेता सध्याच्या काळात पर्यटनाबरोबरच तीर्थाटनही तितकेच महत्त्वाचे झाल्याचे सांगितले. महामंडलेश्वर श्री विश्वेश्वरानंद गिरीजी म्हणाले की, जैन समाजाचे योगदान फार मोठे आहे. आपले मूलतत्त्व या समाजाने आजही जपून ठेवले आहे. आध्यात्मिक विकासासह देशाच्या सर्व क्षेत्रामध्ये जैन समाज यापुढील काळातही योगदान देत राहील.

Web Title: Inauguration of 'Pavitra Jain Pilgrimage Circuit'; 9 will develop the security and facilities of Jain pilgrimage sites

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.