अंधेरी रेल्वे स्थानकाबाहेरील शिल्पाचे प्रसिद्ध अभिनेते टायगर श्रॉफच्या हस्ते उदघाटन
By मनोहर कुंभेजकर | Published: March 3, 2024 08:36 PM2024-03-03T20:36:59+5:302024-03-03T20:37:12+5:30
या शिल्पाची संकल्पना भाजपाचे स्थानिक आमदार अमित साटम यांची असून प्रख्यात कलाकार रुबल नागी यांनी साकारली आहे.
मुंबई- मुंबईतील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी अंधेरी रेल्वे स्थानक आहे. अंधेरी पश्चिमेला पश्चिमेला फलाट क्रमांक 1 च्या प्रवेशद्वाराजवळ निर्देशित केलेल्या आकर्षक शिल्पाचे उदघाटन आज सायंकाळी प्रसिद्ध सिने अभिनेते टायगर श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आले. हे शिल्प अंधेरी पश्चिमेला गेल्या १० वर्षांत केलेल्या विविध विकासकामांचे प्रतीक आणि चित्रण करते.
या शिल्पाची संकल्पना भाजपाचे स्थानिक आमदार अमित साटम यांची असून प्रख्यात कलाकार रुबल नागी यांनी साकारली आहे. चित्रपट निर्माते आनंद पंडित आणि चित्रपट निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते अशोक पंडित हे देखील यावेळी उपस्थित होते.यावेळी मान्यवरांनी आमदार अमित साटम यांच्या कार्याचा आणि कल्पकतेचा गौरव केला.अंधेरीची महती या शिल्पातून प्रदर्शित केल्याने अंधेरीच्या सौदर्यात भर पडेल असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
अंधेरी(प) स्थानका बाहेरील ब स्थापित केलेल्या शिल्पावर अंधेरीतील प्रतिष्ठित अश्या गिल्बर्ट टेकडी, इस्कॉन मंदिर, जुहू बीच आदी प्रतिष्ठित ठिकाणांचा समावेश असून मुंबई सेल्फी पॉईंट त्यावर पेंट केलेले आहे.