मालाडच्या अंबोजवाडी झोपडपट्टीतील पर्जन्य जलवाहिनीचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:06 AM2020-12-06T04:06:14+5:302020-12-06T04:06:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मालाड पश्चिम विभागातील सर्वांत मोठी झोपरपट्टी अंबोजवाडी, मालवणी गेट क्र. ८, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मालाड पश्चिम विभागातील सर्वांत मोठी झोपरपट्टी अंबोजवाडी, मालवणी गेट क्र. ८, मालाड (वे.) मुंबई येथील मुख्य मार्केट नाक्यापासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मोनिया मजिद मुख्य रस्त्यापर्यंत पर्जन्य जलवाहिनी (भूमिगत गटार) व त्याला प्रत्येक गल्लीमधून जोड पर्जन्य जलवाहिनी (कल्व्हट) मंजूर केली आहे.
विभागप्रमुख सुधाकर सुर्वे व महिला विभाग संघटक मनाली चौकीदार व पी /उत्तर प्रभाग समिती अध्यक्षा व प्रभाग क्र. ४९ च्या स्थानिक नगरसेविका संगीता संजय सुतार यांच्या हस्ते या बांधकामाचे व पर्जन्य जलवाहिनीचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी समाजसेवक संजय सुतार, मच्छीमार नेते किरण कोळी, कांदिवली विधानसभा संघटक संतोष राणे, महिला उपविभाग संघटक जयश्री म्हात्रे, शाखाप्रमुख संदेश घरत (४९), जाॅन डेव्हीड (३४), संतोष शेट्टी (४८), महिला शाखा संघटक संगीता कोळी, श्री हरबादेवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महेश पाटील, कार्यालय अधिकारी सुधाकर गुरव व शिवसैनिक तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते.
------------------------------------