मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्सोवा महोत्सवाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 02:41 AM2018-01-20T02:41:11+5:302018-01-20T02:41:14+5:30

सामान्यांचे सबलीकरण करणारे आणि संवेदनशीलता जोपासणाºयांच्या गौरवातून इतरांनाही प्रेरणा मिळते.

Inauguration of the Versova Festival at the hands of Chief Minister | मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्सोवा महोत्सवाचे उद्घाटन

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वर्सोवा महोत्सवाचे उद्घाटन

Next

मुंबई : सामान्यांचे सबलीकरण करणारे आणि संवेदनशीलता जोपासणाºयांच्या गौरवातून इतरांनाही प्रेरणा मिळते. त्यामुळे सामाजिक आशय जोपासणा-या घटकांना सरकारचे नेहमीच पाठबळ राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. वर्सोवा येथे ‘ती’ फाउंडेशनच्या वतीने आयोजित वर्सोवा महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छतादूत अफरोझ शहा, गीतकार समीर अंजान, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूझा, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कुलकर्णी, जनसेवा शिक्षण मंडळाचे संचालक मनिष आणि वैशाली म्हात्रे, उद्योजक बालाजी पटेल आदींचा ‘वर्सोवा गौरव’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या वेळी आमदार भारती लव्हेकर, विनायक मेटे, नीतेश राणे, अभिनेते अक्षय कुमार, ज्येष्ठ पत्रकार अभिनंदन थोरात आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, लोकांमधील लोकांच्या गौरवाने नीतिमूल्यांचे जतन करणाºया व्यक्तिमत्त्वांचा सन्मान व्हायला हवा. ते इतरांनाही प्रेरणादायी ठरते, शिवाय ती व्यक्तिमत्त्वेही प्रेरणा घेऊन अधिक चांगले काम करतात. स्वच्छतादूत अफरोज शहा यांनी एक व्यक्ती आपल्या कामातून अनेकांच्या जीवनात परिवर्तन आणू शकतो, याचे उदाहरण घालून दिले आहे. अभिनेते अक्षय कुमार यांनी शहिदांच्या कुटुंबीयांना मदत, पाणी, स्वच्छता या विषयाबाबत संवेदनशीलपणे काम करतात. आताही ते महिलांविषयीच्या संवेदनशील विषयाला वाहिलेला ‘पॅडमॅन‘ हा आशयपूर्ण चित्रपट घेऊन येताहेत.
भारती लव्हेकर यांनी सुरू केलेल्या ‘डॉटर्स आॅफ वर्सोवा’ या संकल्पनेचा पुढचा टप्पा म्हणजे ‘डॉटर्स आॅफ महाराष्ट्रा’लाही आवश्यक पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
महोत्सवाच्या संयोजिका
लव्हेकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कार्य अहवालाचे प्रकाशन, तसेच मत्स्य व्यवसायाशी निगडित महिला बचत गटांच्या
विविध उत्पादनांचेही अनावरण करण्यात आले. वर्सोवा मेट्रो
ग्राउंडवर २८ जानेवारीपर्यंत हा
महोत्सव चालणार आहे.

Web Title: Inauguration of the Versova Festival at the hands of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.