‘नव्या भारताच्या निर्मितीत गोरखपूरची घटना लाजिरवाणी’, नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले - अरुण जेटली   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:36 AM2017-08-21T05:36:36+5:302017-08-21T05:37:10+5:30

नव्या भारताच्या निर्मितीत गोरखपूरसारख्या घटना लाजिरवाण्या असल्याचे सांगत, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील योगी सरकारला घरचा अहेर दिला. जागतिक दर्जाच्या सार्वजनिक संस्था व सेवांच्या माध्यमातूनच भविष्यात गोरखपूरसारख्या दुर्घटना रोखणे शक्य असल्याचे जेटली यांनी या वेळी स्पष्ट केले.

 'The incident of Gorakhpur is shameful' in the creation of a new India, Naxalism breaks down due to the non-combatant act - Arun Jaitley | ‘नव्या भारताच्या निर्मितीत गोरखपूरची घटना लाजिरवाणी’, नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले - अरुण जेटली   

‘नव्या भारताच्या निर्मितीत गोरखपूरची घटना लाजिरवाणी’, नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले - अरुण जेटली   

Next

मुंबई : नव्या भारताच्या निर्मितीत गोरखपूरसारख्या घटना लाजिरवाण्या असल्याचे सांगत, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी उत्तर प्रदेशातील योगी सरकारला घरचा अहेर दिला. जागतिक दर्जाच्या सार्वजनिक संस्था व सेवांच्या माध्यमातूनच भविष्यात गोरखपूरसारख्या दुर्घटना रोखणे शक्य असल्याचे जेटली यांनी या वेळी स्पष्ट केले.
विलेपार्ले येथे मुंबई भाजपाच्या वतीने आयोजित ‘न्यू इंडिया’ कार्यक्रमात जेटली बोलत होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपाध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह भाजपा खासदार, आमदार उपस्थित होते.
देशभर भाजपाच्या वतीने ‘संकल्प से सिद्धी’ आणि ‘आय एम न्यू इंडिया’ या संकल्पनेवर कार्यक्रम हाती घेतले जात आहेत. या अंतर्गत मुंबईत आयोजित कार्यक्रमात जेटली यांनी गोरखपूर येथील बालमृत्यूंवरून योगी सरकारवर नाराजी व्यक्त केली. गोरखपूरमध्ये बाबा राघव दास रुग्णालयात गेल्या आठवड्यात प्राणवायूअभावी ७२ बालकांचा मृत्यू झाला होता.
या प्रकरणी विरोधकांनी योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशातच
अरुण जेटली यांनीही योगी आदित्यनाथ यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला.
मोदी सरकार ७ किंवा ७.७५ टक्के विकासदरावर समाधान मानणारे नाही. विकासाची गती वाढविण्यासाठी पायाभूत सोईसुविधा, ग्रामविकास आणि संरक्षण
क्षेत्रासाठी अधिक निधी देण्यावर सरकारचा भर असल्याचे जेटली यांनी सांगितले.
काँग्रेस सरकारच्या काळातील भ्रष्टाचाराबाबत बोलताना जेटली म्हणाले की, तत्कालीन सरकारमध्ये भ्रष्टाचार असल्याने रोज नवीन
प्रकरण उघड व्हायचे. त्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून माझे आणि सुषमा स्वराज यांचे काम सोपे होते, असे सांगत, त्यांनी काँग्रेसला चिमटा काढला.

देशाच्या विकासासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कठोर पावले उचलण्यास कचरणार नाही. नोटाबंदीमुळे नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले असून, जम्मू-काश्मीरमधील दगडफेकीच्या घटना कमी झाल्या आहेत. दगडफेक करणाºयांची आर्थिक रसदच बंद केली पाहिजे. दगडफेक करणाºयांना आर्थिक रसद पुरविणाºयांवर आम्ही कारवाई केली. त्याचा परिणाम दिसू लागला असून, दगडफेकीच्या घटना कमी झाल्याचे जेटली यांनी सांगितले. नोटाबंदीनंतर फुटिरतावाद्यांना परदेशातून मिळणारी आर्थिक रसद बंद झाली. नोटाबंदीमुळे देशाबाहेर जाणारा पैसा बँकिंग व्यवस्थेत आल्याचा दावा जेटली यांनी केला.

Web Title:  'The incident of Gorakhpur is shameful' in the creation of a new India, Naxalism breaks down due to the non-combatant act - Arun Jaitley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत