सिलेंडर गळतीमुळे 10 वर्षांत 1116 ठिकाणी आगीच्या घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 03:49 PM2018-10-30T15:49:52+5:302018-10-30T15:50:28+5:30
11 हजार 889 आग अन्य कारणामुळे लागली आहे. या आगीत एकूण 609 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 212 पुरुष व 212 स्त्री आणि 29 मुलांचा समावेश आहे. तसेच आगीच्या घटनेत 89 कोटी, 4 लाख, 86 हजार, 102 रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
मुंबई - मुंबई भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. तसेच मुंबईला सर्वात जास्त सुरक्षित शहर मानले जाते. परंतु मुंबई अपघाताचे शहर बनले आहे. कारण दहा वर्षात मुंबईत तब्बल 48,434 आग लागण्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना मुंबई अग्निशमन दलाने दिली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई अग्निशमन दलाकडे 2008 पासून 2018 पर्यंत मुंबईत किती आग लागली आहे आणि किती गगनचुंबी (टॉवर ) रहिवाशी इमारतीत, व्यावसायिक इमारतीत आणि झोपड्यांत आग लागली आहे. तसेच कोणत्या कारणामुळे आग लागली आणि आगीच्या दुर्घटनेत किती लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच किती रुपयांच्या मालमत्तेच्या नुकसान झाले आहे, याबाबत माहिती आरटीआयच्या माध्यमातून मागितली होती. त्यानुसार अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीप्रमाणे 2008 पासून जुलै 2018 पर्यंत एकूण 48 हजार 434 आग लागण्याच्या दुर्घटना घडल्या आहे. त्यापैकी 1 हजार 568 गगनचुंबी इमारतीत तर 8 हजार 737 रहिवाशी इमारतीत, 3833 व्यासायिक इमारतीत आणि 3151 झोपडपाट्यामध्ये आग लागली आहे. सर्वात जास्त तब्बल 32 हजार 516 आग लागण्याचे कारण शॉर्टसर्किट आहे. तब्बल 1 हजार 116 आग गॅस सिलेंडर गळतीमुळे लागली आहे. 11 हजार 889 आग अन्य कारणामुळे लागली आहे. या आगीत एकूण 609 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 212 पुरुष व 212 स्त्री आणि 29 मुलांचा समावेश आहे. तसेच आगीच्या घटनेत 89 कोटी, 4 लाख, 86 हजार, 102 रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे.
तसेच परिमंडळ-१ च्याहद्दीत एकूण 9 हजार 887 आगी लागल्या असून त्यात 325 गगनचुंबी इमारत, 1 हजार 546 रहिवाशी इमारत, 987 व्यावसायिक इमारत आणि 75 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे. तसेच परिमंडळ-२ च्या हद्दीत सर्वात जास्त एकूण 10 हजार 719 आगी लागल्या असून त्यात 129 गगनचुंबी इमारती, 1824 रहिवाशी इमारती, 664 व्यावसायिक इमारती आणि 934 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे. परिमंडळ-३ च्याहद्दीत एकूण 8 हजार 717 आगी लागल्या असून त्यात 496 गगनचुंबी इमारती,1 हजार 382 रहिवाशी इमारती, 939 व्यावसायिक इमारत आणि 443 झोपड्यात घटनेच्या समावेश आहे. तसेच परिमंडळ-४ च्याहद्दीत एकूण 8 हजार 328 आगी लागल्या असून त्यात 289 गगनचुंबी इमारती, 1835 रहिवाशी इमारती, 661 व्यावसायिक इमारती आणि 403 झोपड्यांचा या घटनेच्या समावेश आहे. तसेच परिमंडळ-५ च्याहद्दीत एकूण 5 हजार 683 आगी लागल्या असून त्यात 50 गगनचुंबी इमारती, 1547 रहिवाशी इमारती, 208 व्यावसायिक इमारती आणि 1273 झोपड्यांना आगी लागल्या आहे. तसेच परिमंडळ-६ च्याहद्दीत एकूण 5 हजार 107 आगी लागल्या असून त्यात 279 गगनचुंबी इमारती, 603 रहिवाशी इमारती, 374 व्यावसायिक इमारती आणि 23 झोपड्यात आगीच्या घटना घडली आहे. सर्वात जास्त गगनचुंबी इमारतीत परिमंडळ-३ च्या हद्दीत एकूण 496 आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त रहिवाशी इमारतीत परिमंडळ-४ च्या हद्दीत 1835 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त व्यावसायिक इमारतीत परिमंडळ-१ च्या हद्दीत 987 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त झोपड्यात परिमंडळ-५ च्या हद्दीत 1273 इतक्या आगीच्या घटना घडल्या आहे. तसेच सर्वात जास्त एकूण 177 लोकांचा बळी परिमंडळ-१ च्या हद्दीत झाला आहे. तसेच सर्वात जास्त आगीच्या घटनेत नुकसान एकूण 39 कोटी, 48 लाख, 9 हजार, 686 रुपयांच्या नुकसान झाले आहे.