रोहा ते मडूरादरम्यानचा भाग मध्य रेल्वेत समाविष्ट करा; कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करा
By सचिन लुंगसे | Published: July 1, 2024 06:58 PM2024-07-01T18:58:41+5:302024-07-01T18:58:48+5:30
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
मुंबई : कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या निर्मितीच्या वेळी २२ टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्र शासनाने केली आहे. कोकण रेल्वे ही स्वायत्त संस्था असल्यामुळे त्याची देखभाल, दुरुस्ती व कामे निधीअभावी मागील २५ वर्षांपासून रखडली आहेत. परिणामी प्रवाशांना योग्य सेवा मिळत नाहीत किंवा त्यामध्ये अडथळे येत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेच्या २५ वर्षानंतरही विकासाला मर्यादा येत आहेत. यासाठीच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करण्यासाठी विधीमंडळात तसा ठराव पारित करून तो केंद्र सरकारकडे पाठवावा. शिवाय कोकण रेल्वेचा महाराष्ट्रातील रोहा ते मडूरा दरम्यानचा भाग हा भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यासाठी केंद्राकडे शिफारस करावी. अशी मागणी करण्यात आली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्पात कोकण रेल्वेचा समावेश होत नसल्याने निधी अभावी कोकण रेल्वेतील पायाभूत सुविधांच्या विकास कामांना खिळ बसली आहे. कोकण रेल्वे मार्गावर भारतीय रेल्वेपेक्षा प्रवासी वाहतूकीवर ४० टक्के तर मालवाहतुकीवर ५० टक्के जास्तीचा अधिभार लावला आहे. जास्त प्रवासभाडे देऊनही प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळत नाहीत. कोकण रेल्वे मार्गावर निधी अभावी कोकण रेल्वेचे दुहेरीकरण, सावंतवाडी रोड टर्मिनस, संपुर्ण फलाटावर शेड, सरकता जिना, रेल्वे ब्रीज, पिण्याचे पाणी, फलाट उंची, इंडीकेटर अशी अनेक कामे रखडली आहेत. याचा परिणाम मागणी करूनही कोकण रेल्वे मार्गावर कोकणवासियांना जादाच्या रेल्वे मिळत नाहीत, असे सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी सांगितले.
काय होऊ शकते
- सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न मार्गी लागेल.
- नवीन रेल्वे गाड्याही वाढवता येतील.