प्रधानमंत्री आवास योजनेत ईडब्ल्यूएससाठी उत्पन्न मर्यादा 3 ऐवजी 6 लाखांवर; एमएमआर क्षेत्रासाठी मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 12:03 AM2023-07-13T00:03:20+5:302023-07-13T00:03:38+5:30

एमएमआर क्षेत्रात ईडब्ल्यूएस घटकांसाठी उत्पन्न निकष बदलला; महाराष्ट्र सरकारला यश

Income limit for EWS in Pradhan Mantri Awas Yojana to 6 lakh instead of 3; Approval for MMR area | प्रधानमंत्री आवास योजनेत ईडब्ल्यूएससाठी उत्पन्न मर्यादा 3 ऐवजी 6 लाखांवर; एमएमआर क्षेत्रासाठी मंजुरी

प्रधानमंत्री आवास योजनेत ईडब्ल्यूएससाठी उत्पन्न मर्यादा 3 ऐवजी 6 लाखांवर; एमएमआर क्षेत्रासाठी मंजुरी

googlenewsNext

मुंबई : प्रधानमंत्री आवास योजनेतील परवडणाऱ्या घरांसाठी मुंबई महानगर क्षेत्रात आर्थिक कमकुवत घटकांसाठी उत्पन्नाचा निकष आता 3 लाख रुपयांवरुन 6 लाख रुपये करण्यात आला आहे. याचा फायदा लाखो नागरिकांना होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, केंद्र सरकारने तसा निर्णय घेतला आहे.

फडणवीस यांनी ट्विट करून याची माहिती दिली आहे. केंद्रीय नगरविकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश काढला आहे. या निर्णयामुळे म्हाडा, सिडकोच्या घरांसाठी अर्ज करणाऱ्या एमएमआर क्षेत्रातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना नागरी अंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रासाठी (एमएमआर) आर्थिक कमकुवत घटकांसाठी (ईडब्ल्यूएस) उत्पन्नाचे निकष 3 लाखांऐवजी 6 लाख रुपये करण्यात यावेत, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकारने 21 जून 2023 रोजी एक पत्र पाठवून केली होती. 

त्यानंतर स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्याशी संपर्क करुन त्यांना यासंदर्भात विनंती केली होती. केंद्र सरकारने आजच राज्य सरकारला पत्र पाठवून ही मागणी मान्य करण्यात आल्याचे कळविले आहे. फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे या निर्णयाबद्दल आभार मानले आहेत.

Web Title: Income limit for EWS in Pradhan Mantri Awas Yojana to 6 lakh instead of 3; Approval for MMR area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.