Join us

मुंबईतूून ६0६ कोटींचे उत्पन्न

By admin | Published: June 23, 2014 2:33 AM

मुंबईच्या शहर आणि उपनगरातून धावणारी लोकल, त्यामधून दिवसाला लाखो प्रवाशांचा होणारा प्रवास आणि मध्य तसेच पश्चिम रेल्वेला मिळणारे कोट्यवधीचे उत्पन्न

मुंबईच्या शहर आणि उपनगरातून धावणारी लोकल, त्यामधून दिवसाला लाखो प्रवाशांचा होणारा प्रवास आणि मध्य तसेच पश्चिम रेल्वेला मिळणारे कोट्यवधीचे उत्पन्न. याकडे पाहिल्यास यंदा झालेली भाडेवाढ ही लोकल प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री लागल्यासारखीच आहे. शहर आणि उपनगरातून धावणाऱ्या लोकल सेवेतून २0१३-१४मध्ये मध्य व पश्चिम रेल्वेला मिळून १ हजार १६७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न देणाऱ्या उपनगरीय लोकल प्रवाशांचे आता येणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पाकडे लक्ष असणार आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. या दोन्ही मार्गांवरून जवळपास ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासी प्रवास करीत असतानाही आणि रेल्वेला कोटींची कमाई होत असतानाही आजही मुंबईच्या उपनगरीय रेल्वे स्थानकांवर सोयीसुविधांचा अभाव असल्याचे दिसते. अपुरी प्रसाधनगृहे, प्रसाधनगृहांची अस्वच्छता, स्थानकांवरील अस्वच्छता, प्लॅटफॉर्मची उंची, अपुऱ्या तिकीट खिडक्या यामुळे प्रवाशांना बरेच हाल सोसावे लागतात. कोट्यवधींचे उत्पन्न लोकल सेवेतून मध्य आणि पश्चिम रेल्वेला मिळत असतानाही प्रवासी उपेक्षित का, असा सवाल उपस्थित होतो.