शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता जप्त; एकाच इमारतीमधील ३१ फ्लॅट्सवर टाच

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 08:34 AM2022-04-08T08:34:46+5:302022-04-08T08:37:05+5:30

शिवसेनेच्या आणखी एका नेत्याला दणका; यशवंत जाधव यांच्या अडचणीत भर

income tax department attaches 41 properties linked to shiv sena leader yashwant jadhav | शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता जप्त; एकाच इमारतीमधील ३१ फ्लॅट्सवर टाच

शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या ४१ मालमत्ता जप्त; एकाच इमारतीमधील ३१ फ्लॅट्सवर टाच

googlenewsNext

मुंबई: शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या ४१ मालमत्ता आयकर विभागानं जप्त केल्या आहेत. यामध्ये भायखळा येथील फ्लॅट्स, हॉटेल आणि वांद्र्यातील एका फ्लॅटचा समावेश आहे. या प्रकरणात लवकरच सक्तवसुली संचलनालयाची एंट्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जाधव यांच्या अडचणी वाढू शकतात.

शिवसेना नेते यशवंत जाधव गेल्या अनेक दिवसांपासून आयकर विभागाच्या रडारवर आहेत. जाधव, त्यांचे कुटुंबीय आणि सहकारी यांच्या ४१ मालमत्तांवर आयकर विभागानं टाच आणली आहे. त्यात भायखळ्यातील एकाच इमारतीमधील ३१ फ्लॅट्सचा समावेश आहे. याशिवाय याच भागातील एम्पिरियल क्राऊन हॉटेलवरही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. वांद्र्यातील ५ कोटींचा फ्लॅटदेखील जप्त करण्यात आला आहे.

आयकर विभागाच्या कलम १३२ ९(बी) च्या अंतर्गत यशवंत जाधव यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे नेते असलेले जाधव भायखळ्यात वास्तव्यास आहेत. याच भागातील एका इमारतीत त्यांचे तब्बल ३१ फ्लॅटस आहेत. या सगळ्या फ्लॅट्सवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच आयकर विभागानं जाधव यांच्या मालमत्तांवर धाड टाकली होती. ही कारवाई ३ दिवस चालली होती.

कंत्राटदार बिमल अग्रवाल यांच्या कंपनीच्या माध्यमातून जाधव यांच्या नातेवाईकांच्या नावावर मालमत्तांची खरेदी करण्यात आली. त्यासाठी रोख रकमेत व्यवहार झाले. ही रक्कम बेहिशोबी असल्याचं आयकर विभागाच्या कारवाईतून समोर आली. या प्रकरणात मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा संशय आयकर विभागाला आहे. त्यामुळे लवकरच ईडीकडून जाधव यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास जाधव यांच्या अडचणी आणखी वाढू शकतात.
 

Read in English

Web Title: income tax department attaches 41 properties linked to shiv sena leader yashwant jadhav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.