Join us

Anurag Kashyap Breaking ! अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या मालमत्तांवर प्राप्तिकर विभागाचे छापे; करचोरीचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 13:05 IST

income tax department has raided the houses of anurag kashyap vikas bahl taapsee pannu: प्राप्तिकर विभागाचं धाडसत्र सुरू; मुंबईतील आणि मुंबई बाहेरील मालमत्तांवर छापे

मुंबई: दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बेहेल आणि अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरावर आणि मालमत्तांवर प्राप्तिकर विभागानं छापे टाकले आहेत. ही कारवाई फँटम फिल्म्सशी संबंधित असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुंबई आणि पुण्यातल्या अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभागाची पथकं छापे टाकत आहेत.  या छापेमारीतून महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते. (income tax department has raided the houses of anurag kashyap vikas bahl taapsee pannu:)अनुराग कश्यप, Anurag Kashyap विकास बेहेल VikasBahl आणि तापसी पन्नूनं Taapsee pannu मोठ्या प्रमाणात आयकर भरला नसल्याचा संशय केंद्रीय यंत्रणेला आहे. त्यामुळेच या कलाकारांशी संबंधित मुंबई आणि मुंबई बाहेरील ठिकाणांवर धाडसत्र सुरू आहे. या छापासत्रातून अनेक मोठी नावं पुढे येऊ शकतात, अशी माहिती सुत्रांनी दिली.अनुराग, तापसी, विकास बेहेल, मधू मंटेना यांच्यासह अनेक बड्या कलाकारांची मालमत्तांवर प्राप्तिकर विभागानं छापे टाकले आहेत. फँटम फिल्म्सनं केलेल्या करचोरी प्रकरणात छापेमारी सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अनुराग, विकास आणि मधू फँटम फिल्म्सचे संस्थापक आहेत. फँटमची मालकी अनुरागकडे आहे. मुंबई आणि पुण्यात २२ ठिकाणांवर सध्याच्या घडीला प्राप्तिकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे.फँटम फिल्म्सची स्थापना आणि संबंधित व्यक्तीफँटम फिल्म्स चित्रपट निर्मिती क्षेत्रातील खासगी कंपनी आहे. तिची स्थापना २०१० मध्ये झाली. अनुराग कश्यप, विकास बेहेल, मधू मंटेना यांनी फँटमची उभारणी केली. चित्रपट निर्मिती आणि वितरणाचं काम फँटम कंपनी करते. अनुराग कश्यप या कंपनीचा मालक आहे. मार्च २०१५ मध्ये कंपनीतील ५० टक्के हिस्सा रिलायन्स इंटरटेनमेंटनं खरेदी केला. विकास बेहेल यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप झाल्यानं २०१८ मध्ये त्याची फँटममधून हकालपट्टी करण्यात आली.

टॅग्स :अनुराग कश्यपतापसी पन्नूविकास बहलइन्कम टॅक्स