प्राप्तिकर विभागाची मुंबईत माेठ्या उद्योगसमूहावर छापेमारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:08 AM2021-02-16T04:08:18+5:302021-02-16T04:08:18+5:30
१५०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्राप्तिकर विभागाने हॉटेलिंग व पानमसाले क्षेत्रातील ...
१५०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्राप्तिकर विभागाने हॉटेलिंग व पानमसाले क्षेत्रातील एका उद्योगसमूहावर छापे टाकून सुमारे १५०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली. गुटखा व मसाल्याच्या माध्यमातून त्यांनी परदेशात मोठी गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
गेल्या आठवड्याभरापासून ही कारवाई सुरू असून, त्यातून अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. आतिथ्य क्षेत्रात काम करण्याव्यतिरिक्त प्रामुख्याने गुटखा, पानमसाला आणि संबंधित पदार्थांच्या उत्पादनातील कार्यरत ही ब्रिटिश व्हर्जिन आयलँड्स (बीव्हीआय)मध्ये नोंदणीकृत आहे. त्यांचे दुबईत कार्यालय असून, या समूहाच्या अध्यक्षांच्या नियंत्रणाखाली असलेल्या कंपनीकडे असलेल्या परदेशी मालमत्तांचा शोध घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कंपनीची निव्वळ मालमत्ता ८३० कोटी रुपये असून, त्यातील ६३८ कोटी शेअर्स प्रीमियमच्या स्वरूपात देशातील प्रमुख कंपन्यांमध्ये पुन्हा वळविण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, छाप्यात विविध डिजिटल पुरावे जप्त केले असून, फॉरेन्सिक विश्लेषणाने ईमेल संप्रेषण प्राप्त केले आहे.
या समूहाने प्राप्तिकर अधिनियम १९६१च्या कलम ८०आयसीअंतर्गत ३९८ कोटी रुपयांपर्यंतच्या बनावट वजावटीचा लाभ घेतला. या समूहाने हिमाचल प्रदेशात दोन संस्था स्थापन केल्याचे आढळले. याव्यतिरिक्त या समूहाच्या दोन कारखाना परिसरात २४७ कोटींचे बेहिशोबी पानमसाल्याचे उत्पादन होत असल्याचेही शोधमोहिमेत आढळून आले.
--------