Join us

आयकर विभागाचे झी समूहाच्या कार्यालयांवर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:14 AM

* मुंबई, दिल्लीतील १५ ठिकाणी कारवाईलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील सर्वांत मोठ्या माध्यम समूहापैकी एक असलेल्या झी ...

* मुंबई, दिल्लीतील १५ ठिकाणी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशातील सर्वांत मोठ्या माध्यम समूहापैकी एक असलेल्या झी इंटरटेन्मेन्ट समूहावर आयकर विभागाने सोमवारी छापे टाकले. लाखो रुपयांचा जीएसटी बुडविल्याप्रकरणी मुंबई व दिल्लीतील त्यांच्या १५ कार्यालयांवर छापे टाकून तेथील कागदपत्रांची तपासणी करण्यात येत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, काही त्रुटींबाबत आयकर विभागाने कार्यालयांना भेट दिली असून, त्यांना सहकार्य करण्यात येत असल्याचे झी समूहाच्या प्रवक्त्याकडून सांगण्यात आले.

झी समूहाच्या लोअर परळ येथील मुख्य कार्यालयासह १५ ठिकाणी सकाळी अकराच्या सुमारास अधिकाऱ्यांची स्वतंत्र पथके गेली. प्रत्येक पथकामध्ये सहाजणांचा समावेश होता. सर्व कर्मचाऱ्यांना एका खोलीत थांबण्यास सांगून तपासणी करण्यात आली. जीएसटी विभागाच्या महासंचालकाकडून आयकर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार हे छापे टाकण्यात आल्याचे समजते. या समूहाकडून जीएसटी व आयकर मोठ्या प्रमाणात बुडविण्यात आला आहे, त्यामुळे संबंधित वर्षांतील प्रत्येक विभागाचे आर्थिक व्यवहार तपासण्यात येत आहेत. त्यासंबंधी अनेक दस्तावेज, करारनामे, कागदपत्रे व बँक व्यवहारासंबंधी पुस्तके जप्त केली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.