Join us

आयकर विभागाकडून सोनू सूदच्या घराची दुसऱ्या दिवशी झडती; तपासणीबाबत सस्पेन्स कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2021 5:29 AM

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबई व लखनौतील कार्यालय व घराची आयकर विभागाकडून सलग दुसऱ्या दिवशी झडती  घेण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबई व लखनौतील कार्यालय व घराची आयकर विभागाकडून गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी झडती  घेण्यात आली. बुधवारी २० तास  तपासणी केल्यानंतर ‘आयटी’चे पथक गुरुवारी सकाळी  पुन्हा त्यांच्या जुहू येथील कार्यालय व लोखंडवाला येथील घरी पोहोचले. मात्र, तपासणीबद्दल त्यांच्याकडून काहीही माहिती देण्यात आलेली नाही. 

विविध सामाजिक कार्यासाठी केल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचे स्रोत जाणण्यासाठी संबंधित कागदपत्रे व दस्तावेजाची छाननी केली जात असल्याचे समजते. आयकर विभागाच्या सहा स्वतंत्र पथकाकडून बुधवारी सकाळपासून  कारवाईला प्रारंभ करण्यात आला. लोखंडवाला येथील सहाव्या मजल्यावरील निवासस्थान, जुहूतील कार्यालय व हॉटेल तसेच लखनौमधील कार्यालयात पोहचून  तपासणी सुरू करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत त्यांच्याकडून  विविध बँक खाती, त्यावरील व्यवहार व दस्तावेजाची तपासणी करण्यात आली. २० तासानंतर पथक परतले होते. यावेळी सोनू सूद व त्याचे कुटुंबीय ओशिवरा येथील घरी उपस्थित होते. 

टॅग्स :इन्कम टॅक्ससोनू सूद