Rahul Kanal BREAKING: आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर धाड, राऊतांच्या पीसी आधीच छापेमारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2022 11:12 AM2022-03-08T11:12:25+5:302022-03-08T11:13:34+5:30

शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी आज सकाळी आयकर विभागानं छापेमारी सुरू केली आहे.

income tax dept conducts searches on premises of shiv sena leader rahul kanal | Rahul Kanal BREAKING: आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर धाड, राऊतांच्या पीसी आधीच छापेमारी!

Rahul Kanal BREAKING: आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय राहुल कनाल यांच्या घरावर धाड, राऊतांच्या पीसी आधीच छापेमारी!

googlenewsNext

मुंबई-

शिवसेना उपनेते आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर विभागाने धाड मारल्याची घटना ताजी असतानाच शिवसेनेच्या आणखी एका नेत्याच्या घरी आज सकाळी आयकर विभागानं छापेमारी सुरू केली आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवासेनेचे पदाधिकारी असलेल्या राहुल कनाल Rahul Kanal यांच्या घरी आयकर विभागाने धाड टाकली आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत Sanjay Raut यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी तपास यंत्रणांचा भ्रष्टाचार उघड करणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यापूर्वीच शिवसेना नेत्याच्या घरी आयकर विभागाने धाड मारल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईत वांद्रे येथील अल्मेडा इमारतीत राहुल कनाल यांचं निवासस्थान आहे. त्यांच्या इमारतीबाहेर सकाळपासून केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान तैनात असून आयकर विभागाकडून कनाल यांच्या घरावर धाडसत्र सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. 

कोण आहे राहुल कनाल?
राहुल कनाल हे शिवसेनेचे पदाधिकारी असून राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांचे निकटवर्तीय समजले जातात. तसंच ते युवासेनाच्या कोअर टीमचे सदस्य आहेत. पालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून त्यांना शिक्षण समितीही दिली होती. तसंच श्री साई बाबा संस्थानचे विश्वस्त पदही त्यांचेकडे आहे. 

अनिल परब यांचे निकटवर्तीय संजय कदम यांच्याही घरावर छापा
राहुल कनाल यांच्यासोबतच स्थानिक शिवसेना नेते संजय कदम यांच्याही घरावर आयकर विभागानं धाड टाकल्याची माहिती समोर आली आहे. संजय कदम हे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जातात. संजय कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक पार्टनर असल्याचीही माहिती समोर आली आहे.

निलेश राणेंनी केला गंभीर आरोप
राहुल कनाल यांच्याबाबत निलेश राणे यांनी काही गंभीर आरोप केले आहे. राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाच्या धाडसत्राबाबत एक ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. "आदित्य ठाकरेचा पुरवठा मंत्री राहुल कनाल याच्या घरावर आयकर विभागाची धाड पडली. राहुल कनाल या व्यक्ती बांद्रा या भागात कोणलाही विचारलं तरी कळेल याचे खरे धंदे काय. नाईटलाइफ गँग मधला हा प्रमुख, स्वत: हुक्का पार्लर चावलतो आणि त्या माध्यमातून घाणेरडे धंदे करतो", असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. 

Read in English

Web Title: income tax dept conducts searches on premises of shiv sena leader rahul kanal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.