धुळे : माजी मंत्री व विधान परिषदेचे सदस्य अमरिशभाई पटेल आणि जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्यांसह सुमारे १० जणांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी एकाच वेळी आयकर विभागाच्या पथकांनी तपासणी केली. मुंबई, नाशिक व जळगाव येथील आयकर विभागाच्या पथकांकडून सायंकाळी उशिरापर्यंत हे तपासणीचे काम सुरूच होते. शिरपूर येथील प्रभाकर चव्हाण, राजगोपाल भंडारी, अॅड़ सी़ बी़ अग्रवाल, बबनलाल अग्रवाल, अशोक कलाल, विजय राठी यांच्याकडे तपासणी झाली. धुळे व शिरपूर येथील विविध वस्त्रोद्योग आणि स्टार्च सॉल्व्हंट प्रकल्पस्थळी बुधवारी सकाळी ८ वाजता आयकर विभागाचे पथक अचानक पोहोचले. त्यांनी सर्व ठिकाणी एकाच वेळेस तपासणीस सुरुवात केली. शिरपूरला पथक पोहोचले, तेव्हा निवासस्थानी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल हे आणि धुळ्यात राजवर्धन कदमबांडे हेही आपल्या निवासस्थानीउपस्थित होते.
पटेल-कदमबांडें यांची आयकर तपासणी, सुमारे दहा जणांच्या निवासस्थानी चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 4:41 AM