Join us

रेल्वे स्थानकावरील पाण्याचे एटीएम केंद्र बंद पडल्याने प्रवाशांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 4:06 AM

मुंबई : प्रवाशांना शुद्ध थंड पाणी मिळावे यासाठी मुंबईतील रेल्वेस्थानकावर पाण्याचे एटीएम केंद्र सुरू केले आहेत. मुंबईकरांना उन्हाच्या झळा ...

मुंबई : प्रवाशांना शुद्ध थंड पाणी मिळावे यासाठी मुंबईतील रेल्वेस्थानकावर पाण्याचे एटीएम केंद्र सुरू केले आहेत. मुंबईकरांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत असताना पाण्याचे एटीएम केंद्र बंद आहेत. त्यामुळे गैरसोय होत असून हे पाण्याचे एटीएम केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे.

मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकावर पाण्याचे एटीएम मशीन लावण्यात आले होते. यामध्ये स्वस्त दरात शुद्ध आणि थंड पाणी मिळते. उन्हाळा सुरू झाल्याने दिवसेंदिवस मुंबईच्या तापमानात वाढ होत आहे. असे असताना हे पाण्याचे एटीएम केंद्र हे बंद पडले आहे. शुद्ध पाण्याचे एटीएम बंद पडल्याने प्रवाशांना पाण्याच्या बॉटल विकत घ्याव्या लागत आहेत. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गरज लक्षात घेऊन बंद पडलेले पाण्याचे एटीएम त्वरित सुरू करावे, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे एटीएम केंद्र बंद करण्यात आले होते. लवकरच हे पाण्याचे एटीएम केंद्र सुरू केले जातील, असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

===Photopath===

160321\img-20210316-wa0000.jpg

===Caption===

पाण्याचे एटीएम