सर्व प्रशिक्षणामध्ये अग्निशमन प्रशिक्षणाचा अंतर्भाव केल्यास आगीच्या दुर्घटना कमी होतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:05 AM2021-01-14T04:05:27+5:302021-01-14T04:05:27+5:30

निवृत्त अग्निशमन अधिकारी : आपत्ती व्यवस्थापनाचे प्रॅक्टिकल, प्रॅक्टिस महत्त्वाची लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भंडारा जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीसारख्या ...

Incorporating firefighting training into all training will reduce fire accidents | सर्व प्रशिक्षणामध्ये अग्निशमन प्रशिक्षणाचा अंतर्भाव केल्यास आगीच्या दुर्घटना कमी होतील

सर्व प्रशिक्षणामध्ये अग्निशमन प्रशिक्षणाचा अंतर्भाव केल्यास आगीच्या दुर्घटना कमी होतील

Next

निवृत्त अग्निशमन अधिकारी : आपत्ती व्यवस्थापनाचे प्रॅक्टिकल, प्रॅक्टिस महत्त्वाची

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : भंडारा जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये लागलेल्या आगीसारख्या दुर्घटनेनंतर शासनाने मदतीचा हात देणे, दुर्घटनेच्या चौकशीचे व अग्निशमन यंत्रणेच्या तपासाचे आदेश देणे योग्यच आहे. मात्र, खरी गरज आहे ती शासनाने अग्निशमनचे प्रॅक्टिकल ट्रेनिंग माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षणात सक्तीने लागू करणे. नर्सिंग प्रशिक्षण असो किंवा इंडस्ट्रियल प्रशिक्षण, सर्व प्रशिक्षणामध्ये अग्निशमन या विषयाच्या प्रशिक्षणाचा अंतर्भाव केल्यास पुढील काळात अशा प्रकारच्या दुर्घटना नक्कीच कमी होऊ शकतात.

मुंबई पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व मुंबई अग्निशमन दल विभागाद्वारे अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापनचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. आपण या संधीचा फायदा करून घेत नाही. आज आपली मानसिकता बदलून अग्निशमन, विमोचन व आपत्ती व्यवस्थापनाचे स्वतःहून पुढाकार घेऊन प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेण्याची गरज आहे. फक्त्त अग्निशमन, विमोचन व आपत्ती व्यवस्थापनाच्या पुस्तकी ज्ञानाने आगीसारख्या आपत्तीवर नियंत्रण मिळवता येत नाही, तर त्यासाठी लागते ते धैर्य! हे फक्त्त अग्निशमन, विमोचन व आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रॅक्टिकल व प्रॅक्टिसनेच साध्य होऊ शकते. आपण जिथे राहता अथवा काम करता त्याठिकाणी आपल्या चौकस नजरेने अग्निशमन यंत्रणा व विमोचनामध्ये असलेल्या त्रुटी दूर केल्यास बऱ्याच दुर्घटना आपण टाळू शकतो, असे मुंबई अग्निशमन दलाचे निवृत्त अग्निशमन अधिकारी सुभाष कमलाकर राणे यांनी सांगितले.

दरम्यान, उंच इमारतीमध्ये राहात असाल किंवा काम करत असाल तर अग्निशमन कायद्याअंतर्गत अग्निशमन यंत्रणेची योग्य ती देखभाल परवानाप्राप्त संस्थेकडून करून घेणे. त्याबाबतचे फिटनेस सर्टिफिकेट जानेवारी व जुलैमध्ये आपल्या विभागातील अग्निशमन विभागात जमा करणे बंधनकारक आहे. राष्ट्रीय इमारत संहिता २०१६ नुसार उंच इमारतीचे दोन वर्षांतून एकदा तृतीयपक्षी अग्निपरीक्षण करून घेणे आवश्यक आहे, असेही राणे यांनी सांगितले.

* आत्मपरीक्षण करा

- सर्वसामान्यांकडून या विषयाकडे जास्त दुर्लक्ष होत आहे. आपण जिथे राहताे किंवा काम करताे, तेथील अग्निशमन यंत्रणा व विमोचनाबाबत आपल्याला काय माहिती आहे ? आपल्याला फायर एक्स्टिंग्युशर वापरण्याची योग्य पद्धती माहिती आहे का? - आग लागल्यास ती विझवणे असो अथवा विमोचन व सुटका करण्याची प्राथमिक पद्धती आपल्याला माहीत आहे का? आपल्या राहत्या अथवा काम करता त्या इमारतीमधील अग्निशमन यंत्रणेची नीट निगा व काळजी घेतली जाते का? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे स्वत:लाच विचारून आत्मपरीक्षण केल्यास व याेग्य कृती हाती घेतल्यास आगीसारख्या दुर्घटना राेखता येतील.

* काय केले पाहिजे

- आगीच्या दुर्घटना या इलेक्ट्रिक यंत्रणेतील त्रुटींमुळे होतात. त्यामुळे इलेक्ट्रिक यंत्रणा तपासून घेतली पाहिजे. त्रुटी दूर केल्या पाहिजेत.

- अग्निशमन यंत्रणा वापरण्याचा सराव ठेवला पाहिजे.

- एक्स्टिंग्युशर, होज रील, स्मोक डिटेक्टशन सिस्टिम, मॅन्युअल कॉल पॉईंटसारख्या उपकरणांच्या वापराची माहिती करून घेतली पाहिजे.

-----------------------

Web Title: Incorporating firefighting training into all training will reduce fire accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.