लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मीटरचे फोटो रीडिंग घेण्याची प्रक्रिया स्वतंत्र मोबाइल ॲपद्वारे सोपी व वेगवान झाली आहे. मीटरच्या रीडिंगसाठी एजन्सीजना मोबदला दिला जातो. तरीही मीटरचे चुकीचे रीडिंग घेणे व फोटो अस्पष्ट असणे, रीडिंग न घेता आल्याचा शेरा देणे, असे प्रकार होत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा महावितरणचे अध्यक्ष विजय सिंघल यांनी दिला आहे.
विजय सिंघल हे दर पंधरवड्याला प्रामुख्याने अचूक मीटर रीडिंग संदर्भात आढावा घेत आहेत. मुख्यालयासोबतच क्षेत्रीय स्तरावरील विविध उपाययोजना तसेच कामात कुचराई करणाऱ्या एजंसींविरुद्ध सुरू असलेली कारवाई यामुळे अचूक मीटर रीडिंगमध्ये सुधारणा झाली आहे. ग्राहकांना रीडिंगनुसार वीज वापराचे योग्य वीजबिल मिळत असल्याने त्यांच्या तक्रारींचे प्रमाण कमी झाले आहे. चुकीच्या वीजबिलांमुळे ग्राहकांना होणारा मनस्ताप व बिल दुरुस्तीचा त्रास तसेच महसुलाचे नुकसान अजिबात सहन केले जाणार नाही. मीटरचे अचूक रीडिंग घेण्यात हयगय करणाऱ्या एजंसींविरुद्ध कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
मीटर रीडिंगचे फोटो घेण्यामध्ये आणखी सुधारणा आवश्यक असलेल्या ३५१ उपविभाग कार्यालयप्रमुख तसेच सर्व १४७ विभाग कार्यालयप्रमुख अभियंत्यांशी व्हीसीद्वारे थेट संवाद साधण्यात आला.
वीजगळती कमीवीजगळती कमी करण्यासोबतच ग्राहक हिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत ग्राहकाभिमुख सेवेच्या सुधारणांना मोठा वेग देण्यात आला आहे. यात बिलिंगसाठी वीज मीटरच्या अचूक रीडिंगला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे.
वीजचोरीविरोधी मोहीममहावितरणकडून गेल्या दीड वर्षांमध्ये वीजग्राहकांना चांगली सेवा देण्यासाठी तसेच कंपनीच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करण्यासाठी कामे करण्यात येत आहेत. वीजचोरीविरोधी मोहीम, वीजबिल वसुली आदींचा समावेश आहे.