Join us

सोमवारी ठाणे जिल्ह्यात ४३१ कोरोना रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2020 4:04 AM

* आठ जणांचा मृत्यू : आरोग्य विभागाची माहितीलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत सोमवारी कोरोनाचे ४३१ ...

* आठ जणांचा मृत्यू : आरोग्य विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांत सोमवारी कोरोनाचे ४३१ रुग्ण आढळले. जिल्ह्यात आता दोन लाख २९ हजार १९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, आठ मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील मृतांची संख्या पाच हजार ६८५ झाली आहे.

ठाणे शहरात १६२ रुग्ण आढळले असून यामुळे ५१ हजार ३१७ बाधित नोंदले आहे. अवघ्या चार जणांचा मृत्यू झाल्यामुळे शहरातील मृतांची संख्या एक हजार २३५ झाली. कल्याण-डोंबिवलीत ८३ रुग्णांची वाढ झाली असून एक मृत्यू झाला. या शहरात ५४ हजार ४० बाधित झाले असून एक हजार ६० मृत्यू नोंदवण्यात आले आहेत.

उल्हासनगरला २१ बाधित सापडले असून एकही मृत्यू नाही. येथे १० हजार ८४२ बाधित रुग्णांसह आतापर्यंत ३५३ मृत्यू झाले आहेत. भिवंडीला सहा बाधित आढळले असून एकही मृत्यू नाही. आता बाधित सहा हजार २८० झाले असून मृतांची संख्या ३४५ झाली आहे. मीरा-भाईंदरमध्ये ४८ रुग्णांची नोंद असून मृत्यूची नोंद नाही. या शहरात २४ हजार १८० बाधितांसह ७५६ मृतांची नोंद झालेली आहे. अंबरनाथमध्ये १० रुग्णांची नव्याने वाढ झाली असून एक मृत्यू आहे. येथे बाधितांची संख्या सात हजार ८६९ झाली असून २८९ मृतांची नोंद झाली आहे. बदलापूरला २० रुग्णांची नोंद झाल्यामुळे येथे आठ हजार ६४ बाधित झाले आहेत. या शहरात एकही मृत्यू नसल्याने मृत्यूची संख्या ९८ कायम आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सात मृतांची नोंद झाली असून एकही मृत्यू नाही. आता बाधित १८ हजार १७६ झाले असून मृत्यू ५६५ नोंदले गेले आहेत.

-----

वसई-विरारमध्ये ४५ नवीन रुग्ण

वसई : वसई-विरार महापालिका हद्दीत सोमवारी दिवसभरात ४५ रुग्ण नव्याने आढळून आले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर शहरात दिवसभरात ४० रुग्ण रुग्णालयातून मुक्त झाले आहेत. शहरांत अजूनही ५४८ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

.......................

नवी मुंबईमध्ये ७४ रुग्ण वाढले

नवी मुंबई : शहरामध्ये सोमवारी दिवसभरामध्ये ७४ रुग्ण वाढले असून, ११९ जण बरे झाले आहेत. उपचारादरम्यान २ जणांचा मृत्यू झाला असून, मृतांची संख्या ९८४ झाली आहे. एकूण रुग्णसंख्या ४८,२५१ झाली असून, त्यामधील ४५,६६२ जण बरे होऊन घरी परतले आहेत. १,६०५ जणांवर उपचार सुरू आहेत.

---

रायगमध्ये ७४ नवे रुग्ण

अलिबाग : रायगड जिल्ह्यात सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी दिवसभरात ७४ नव्या कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधितांची संख्या ५७ हजार ०३१ वर पोचली आहे. दिवसभरात एकही जणांचा मृत्यू झाला नाही, आतार्पयत एकूण १६०३ जणांना मृत्यूने कवटाळले आहे तर ५४ हजार ३७१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.