बंदरांवरील कोविड समर्पित रुग्णालयांची क्षमता वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:06 AM2021-05-01T04:06:27+5:302021-05-01T04:06:27+5:30
नौवहन मंत्र्यांची सूचना मुंबई : देशातील प्रमुख बंदरांच्या अखत्यारीत येणाऱ्या ९ रुग्णालयांचे कोविड समर्पित रुग्णालयांत रूपांतर करण्यात आले आहे. ...
नौवहन मंत्र्यांची सूचना
मुंबई : देशातील प्रमुख बंदरांच्या अखत्यारीत येणाऱ्या ९ रुग्णालयांचे कोविड समर्पित रुग्णालयांत रूपांतर करण्यात आले आहे. या रुग्णालयांची क्षमता वाढविण्यावर भर द्या, अशी सूचना बंदरे, नौवहन आणि जलमार्गमंत्री मनसुख मांडवीय यांनी केली. नुकताच त्यांनी बंदर रुग्णालयांच्या कोरोना व्यवस्थापनासंदर्भात आढावा घेतला.
सध्या देशातील प्रमुख १२ बंदरांवरील ९ रुग्णालयांत कोरोना रुग्णांसाठी विशेष व्यवस्था तयार केली आहे. त्याशिवाय मुंबई, जेएनपीटी, विशाखापट्टणम, मुरगाव (गोवा), चेन्नई, दीनदयाळ बंदरावर ४२२ अतिरिक्त बेड, ३०५ ऑक्सिजन बेड, २८ आयसीयू बेड आणि अन्य अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
देशभरात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता सर्व बंदरप्रमुखांनी जलदगतीने त्यांच्या अख्यत्यारीतील रुग्णालयांच्या क्षमता वाढवाव्यात. सीआरएस निधीचा वापर करून सुविधांमध्ये वाढ करावी. सर्व बंदरांनी ऑक्सिजनशी संबंधित मालवाहतूक करणाऱ्या जहाजांना प्राधान्य द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
..........................................