चक्रीवादळात झालेली मच्छिमारांची नुकसान भरपाई वाढवून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:06 AM2021-03-08T04:06:27+5:302021-03-08T04:06:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांचे सुमारे २१०० कोटी रुपयांचे ...

Increase compensation for fishermen affected by cyclones | चक्रीवादळात झालेली मच्छिमारांची नुकसान भरपाई वाढवून द्या

चक्रीवादळात झालेली मच्छिमारांची नुकसान भरपाई वाढवून द्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्र राज्याच्या ७२० किलोमीटरच्या किनारपट्टीवर झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यातील मच्छीमार बांधवांचे सुमारे २१०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. परंतु त्यांना राज्य सरकारने तुटपुंजी मदत दिली आहे. तरी ती मदत वाढवून मिळावी तसेच मच्छीमारांचा डिझेल परतावा हा २३० कोटी एवढा थकीत आहे, तो सरकारने लवकर द्यावा, अशी मागणी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व विधानपरिषदेचे भाजप आमदार रमेश पाटील यांनी केली आहे. तसेच कोरोनाच्या काळात मच्छीमार बांधवांची मासेमारी बंद होती, त्या काळातील नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली.

आमदार रमेश पाटील यांनी कोळी समाजाच्या अनेक प्रश्नांवर शासनाला धारेवर धरले. सरकारला धारेवर धरत सभागृहाचे लक्ष वेधले. अधिवेशन संपताच मच्छीमारांची संयुक्त बैठक घेऊन त्यांच्या प्रलंबित असणाऱ्या डिझेल परताव्यावर तोडगा काढण्यात येईल, असे मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिले.

Web Title: Increase compensation for fishermen affected by cyclones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.