युवा पिढीशी नाटकांची कनेक्टीव्हीटी वाढवा!

By admin | Published: December 13, 2014 10:31 PM2014-12-13T22:31:26+5:302014-12-13T22:31:26+5:30

मराठी रंगभूमी जिवंत ठेवण्यासाठी नाटकांची कनेक्टीव्हीटी युवा पिढीसोबत वाढविण्याचा सल्ला लोकमतच्या ठाणो आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुकमार टेणी यांनी दिला.

Increase connectivity of plays with younger generation! | युवा पिढीशी नाटकांची कनेक्टीव्हीटी वाढवा!

युवा पिढीशी नाटकांची कनेक्टीव्हीटी वाढवा!

Next
सुधाकर वाघ, संदीप पष्टे ल्ल धसई
मराठी रंगभूमी जिवंत ठेवण्यासाठी नाटकांची कनेक्टीव्हीटी युवा पिढीसोबत वाढविण्याचा सल्ला लोकमतच्या ठाणो आवृत्तीचे निवासी संपादक नंदकुकमार टेणी यांनी  दिला. शिवळे महाविद्यालयात लोकमत प्रायोजित  कार्यक्रमात मराठी नाटय़ विषयक चर्चासत्रत ते बोलत होते.  तसेच यावेळी का.स. वाणी स्मृती प्रतिष्ठानचे डॉ. जगन्नाथ वाणी, डॉ. प्रभाकर मांडे यांनीही मराठी भाषा संवंर्धनाबाबत मार्गदर्शन केले.
मुरबाड तालुक्यातील दोन हजाराहून जास्त विद्याथ्र्याना महाविद्यालयीन शिक्षण देणा:या जनसेवा शिक्षण मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दैनिक लोकमत प्रायोजित का.स. वाणी स्मृती प्रतिष्ठान व का.स. वाणी मराठी साहित्य संवर्धन संस्थेच्या भारतीय मराठी अभ्यास परिषदेचे 26 वे राष्ट्रीय अधिवेशन 13 डिसेंबर व 14 डिसेंबर या दोन दिवस सुरू आहे. या अधिवेशन कार्यक्रमातून ‘वर्तमानकालीन मराठी रंगभूमी आणि मराठी नाटक स्वरुप व विकास’ या विषयावर चर्चा करताना का.स.वाणी स्मृती प्रतिष्ठान, धुळे या संस्थेचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ वाणी यांनी कॅनडात राहून  मराठी भाषा जिवंत ठेवण्यासाठी केलेले प्रय} तसेच ‘एकता’ त्रैमासिकाच्या संपादनाविषयी मनोगत व्यक्त केले.  
डॉ. प्रभाकर मांडे यांनी का.स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्थेच्या एकंदरीत वाटचालीविषयी व 2क्क्क् नंतरच्या रंगभूमीची कैफियत मांडली. याच चर्चासत्रत मराठी नाटक, रंगभूमी, रंगकर्मी यांची गाभा व व्यथा सांगताना मराठी नाटय़भूमीवर  चित्रपटांनी अतिक्रमण करून रंगभूमी संकुचित केली आहे. नाटक सादरीकरणाचे भाडे, प्रॉपर्टी, संगीत, रंगकर्मी मानधन व मालिका भागांचे मानधन व चित्रपटातील माधनांमध्ये प्रचंड तफावत असल्याने कलाकारांनीही नाटय़भूमीकडे पाठ फिरवल्याने रंगमंच पोरके होत चालले आहेत. 
आजर्पयत सामाजिक दृष्टीकोनातून नाटकांचे समीक्षण न झाल्याने नाटके प्रसिद्धीपूर्वीच फ्लॉप झालेली आहेत. पुरोगामी काळात रंगमंचावर स्त्री पात्रंची वानवा असताना बालगंधर्वानी स्त्री अभिनयाचा अविष्कार  दाखवला. आजही समाजातील दारूडय़ाला ‘एकच प्याला’ नाटकातील तळीराम तर अनेक स्त्रियांशी संबंध ठेवणा:यास तो मी नव्हेच मधील लखोबा लोखंडे बोलले जाते. वयोवृद्धांची कथा व व्यथा, नटसम्राट, आई रिटायर होतेय, आई तुला मी कुठे ठेऊ या नाटकांनीच समाजापुढे आणली. नाटक समाजप्रबोधनाचे व जनजागृतीचे साधन असतानाही रुपेरी पडद्याने ते काळवंडले असल्याची खंत लोकमतचे निवासी संपादक नंदकुमार टेणी यांनी व्यक्त केली. 
यावेळी व्यासपीठावर शिवळे महाविद्यालयाचे अध्यक्ष माजी आमदार गोटीराम पवार, संचालक अनंता घोलप,  डॉ. प्रवीण भोळे, डॉ. प्रभाकर मांडे, डॉ. बबनराव पवार, डॉ. के.बी. पाटील, डॉ. सरोज पाटणकर, डॉ. विश्वास पाटील, डॉ. महेश्वरी गावीत, प्रा. भालचंद्र शिंदे, प्रा. अमेाल पाटील, डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. गणोश चंदनशिवे उपस्थित होते.
 
नंदकुमार शिंदे या विद्याथ्र्याने रांगोळीतून साकारलेली पोट्रेट सगळ्यांच्या आकर्षणाचा विषय ठरली. त्याचा जाहीर सत्कारही यावेळी करण्यात आला.तर परिसंवादाच्या पहिल्या सत्रच्या अध्यक्षपदावरून बोलताना टेणी यांनी प्रत्यक्ष नाटकाशी संबंधित असणा:या वक्त्यांचा सहभाग वाढवा, म्हणजे हा परिसंवाद अधिक परिपूर्ण होईल, अशी सूचना केली.

 

Web Title: Increase connectivity of plays with younger generation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.