भ्रष्टाचार वाढता वाढता वाढे

By admin | Published: January 4, 2015 11:07 PM2015-01-04T23:07:19+5:302015-01-04T23:07:19+5:30

भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्व स्तरांतून तक्रारी येत आहेत. तो रोखण्यासाठी जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे

Increase in corruption increases | भ्रष्टाचार वाढता वाढता वाढे

भ्रष्टाचार वाढता वाढता वाढे

Next

जितेंद्र कालेकर, ठाणे
भ्रष्टाचाराच्या विरोधात सर्व स्तरांतून तक्रारी येत आहेत. तो रोखण्यासाठी जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे. तरीही, गेल्या वर्षीच्या तुलनेत २०१४ च्या वर्षभरात भ्रष्टाचाराच्या प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून आले आहे. जानेवारी ते डिसेंबर २०१४ या वर्षभरातील कारवाईचा अहवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जाहीर केला असून यामध्ये ही बाब उघड
झाली आहे. राज्यात १२४५ आणि ठाणे विभागात १५४ सापळ्यांमधून ८० जणांना अटक करण्यात आली. २०१३ मध्ये राज्यभरात ५८३ आणि ठाण्यात ६८ सापळ्यांमधून ९४ लाचखोरांना पकडण्यात आले होते.
ठाणे परिक्षेत्रात २०१४ मध्ये १५४ सापळे लावण्यात आले होते. याव्यतिरिक्त अपसंपदा जमविणारे ५ आणि अन्य भ्रष्टाचाराच्या तक्रारी ५ असे १६४ गुन्हे नोंदविण्यात आले. यात पोलीस पहिल्या तर महसूल विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच ४३ प्रकरणांमध्ये दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली. तर ७३ प्रकरणे ही तपासावर प्रलंबित आहेत. याउलट, २०१३ मध्ये ठाण्यात ६८ सापळ्यांमधून ९४ लाचखोरांना पकडण्यात आले होते. २०१३ च्या तुलनेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दुपटीपेक्षा अधिक तक्रारी आल्या असून त्याच तुलनेत सापळेही लावण्यात आले होते.
२०१४ या वर्षाच्या सुरुवातीलाच पहिल्या ६५ दिवसांमध्येच या विभागाकडे आलेल्या तक्रारींवरून २३ ठिकाणी सापळे लावले होते. त्यात ३५ लाचखोरांना जेरबंद करण्यात आले आहे. यामध्ये १३ पोलिसांना पकडण्यात आले होते. सर्वाधिक म्हणजे सात कारवाया उल्हासनगरात करण्यात आल्या आहेत. येथील एका कारवाईत लोकसेवकांना लाच देणाऱ्या बिल्डरलाही अटक करण्यात आली आहे.
उल्हासनगरमध्येच नगरसेविकेला तिच्या पतीसह तर मीरा-भार्इंदरमधील नगरसेविकेला तिच्या मुलासह अटक करण्यात आली होती. याशिवाय, लोकसेवकांना लाच घेण्यासाठी मदत करणाऱ्या सात खासगी व्यक्तींनाही अटक झाली होती. २०१३ मध्ये ३९ विभागांतील ६८ ठिकाणी सापळे रचून ९५ सरकारी कर्मचाऱ्यांसह खासगी लोकांनाही पकडण्यात आले होते.

Web Title: Increase in corruption increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.