सैन्य भरती घोटाळ्यातील तीन आरोपींच्या कोठडीत वाढ
By admin | Published: March 11, 2017 01:23 AM2017-03-11T01:23:02+5:302017-03-11T01:23:02+5:30
सैन्य भरती घोटाळ्यातील तीन प्रमुख आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयाने शुक्रवारी १४ मार्चपर्यंत वाढवली. सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी
Next
ठाणे : सैन्य भरती घोटाळ्यातील तीन प्रमुख आरोपींची पोलीस कोठडी न्यायालयाने शुक्रवारी १४ मार्चपर्यंत वाढवली.
सैन्य भरतीची प्रश्नपत्रिका फोडल्याप्रकरणी ठाणे पोलिसांनी २४ आरोपींना अटक केली होती. त्यापैकी ८ आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
नागपूर येथील सैन्य भरती कार्यालयातील लिपिकवर्गीय कर्मचारी रवींद्रकुमार जांगू, धरमवीरसिंग आणि निगमकुमार पांडे हे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. न्यायालयाने त्यांची पोलीस कोठडी १४ मार्चपर्यंत वाढवली. उर्वरित आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. (प्रतिनिधी)