Join us  

मुंबईबाहेरील रुग्णांवर खर्चाचा बोजा वाढणार

By admin | Published: February 04, 2016 4:21 AM

महापालिकेच्या बुधवारी सादर झालेल्या ३७ हजार ५२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी ३ हजार ६९३.७४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

मुंबई : महापालिकेच्या बुधवारी सादर झालेल्या ३७ हजार ५२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी ३ हजार ६९३.७४ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. एवढी तरतूद करताना महापालिकेतर्फे मुंबईबाहेरील रुग्णांसाठी शुल्क आकारणीची फेररचना करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. महापालिकेतर्फे उपचार करण्यात येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी अंदाजे ४५ टक्के रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्राबाहेरचे असतात. अशा रुग्णांसाठी स्वतंत्र शुल्क आकारणी रचना लागू करण्याबाबत विचार करण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात मुंबईबाहेरून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना जादा पैसे मोजावे लागू शकतात.आरोग्याच्या अर्थसंकल्पानुसार, २०१६-१७ या आर्थिक वर्षाअखेरपर्यंत स्थळांचे सर्वेक्षण, डाटा आणि सॉफ्टवेअर होस्टिंगकरिता हार्डवेअर बसवणे, रुग्णालय व्यवस्थापन प्रणालीकरिता सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट व युझर अ‍ॅक्सेप्टन्स टेस्ट इत्यादी बाबी पूर्ण करण्यात येणार आहेत. यासाठी ३९.१५ कोटींची तरतूद केली आहे. शासनाकडून आवश्यक ती प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासह लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये पदवीपूर्व अभ्यासक्रमाकरिता असलेल्या १०० जागा १५० इतक्या वाढविण्यासाठीचा प्रस्तावही केंद्राकडे सादर केला आहे. लोकमान्य टिळक महाविद्यालय व सायन रुग्णालयातील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी अतिरिक्त १३८ जागांसाठीचा प्रस्ताव आहे. ५६ जागांसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून त्याला तत्वत: मान्यता मिळाली आहे. सेठ गो.सु. वैद्यकीय महाविद्यालय आणि केईएम रुग्णालयात आता ‘वैद्यकीय शिक्षण’ हा नवीन विभाग सुरू करण्यात आला आहे. शिवाय प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात एक आणि दंत महाविद्यालयात अद्ययावत व्हर्च्युअल ई-क्लासरूम स्थापन करण्यात येत आहे. याकरिता ७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)२००० पासून दर जैसे थे : महापालिकेच्या रुग्णालयात मुंबईबाहेरून येणारे रुग्ण गरीब असतात, याची जाणीव आहे, परंतु २००० सालापासून या संदर्भातील कोणत्याही सेवेत दरवाढ केली नव्हती. आता मुंबई आणि मुंबईबाहेरील रुग्णांसाठी दरांची फेररचना करण्याची वेळ आली आहे. या संदर्भातील विचार सुरू आहे. - अजय मेहता, आयुक्त, मुंबई महापालिकावाढीव रुग्णांकरिता २६६ अतिरिक्त अध्यापकीय पदे निर्माण करण्यासंबंधिचा प्रस्ताव अंतिम करण्यात येत आहे. महापालिकेची सर्व रुग्णालय आणि प्रसूतिगृहातील शुश्रृषा/ परिचारिका सेवांना बळकटी देण्यासाठी परिचारिकांची १,९७६ अतिरिक्त पदे निर्माण करण्याबाबतचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. केईएम, सायन आणि बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयासाठी आणखी ३ कॅथलॅब खरेदी करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर रुग्णांची प्रतीक्षा यादी कमी होण्यास मदत होईल. सायन आणि केईएम रुग्णालयासाठी बायप्लानर डीएसए मशीन्स खरेदी ेकेल्या आहेत.मार्च २०१६ पर्यंत त्या कार्यान्वित होतील. यामुळे पुष्कळ रुग्णांचा जीव वाचवण्यास मदत होईल. केईएमसाठी ८ कोटींची एमआरआय मशीन खरेदी केली आहे. त्याची उभारणी एप्रिल २०१६ पर्यंत होईल. केईएम- मधील न्युक्लिअर मेडिसीन विभागासाठी १२ कोटी इतक्या खर्चाने १२८ स्लाइसेस आणि सर्व उपसाधनांसह नवीन पेट सीटी स्कॅन मशीन खरेदी करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मशिन्सची उभारणी सप्टेंबर २०१६ पर्यंत होईल. तिन्ही मुख्य रुग्णालयात १८.५५ कोटी खर्च करून नवीन मॉड्युलर आॅपरेशन थिएटर्स आॅक्टोबर २०१६ पर्यंत कार्यान्वित केल्या जातील. उपनगरीय रुग्णालयासाठी ११३ दंत खुर्च्या खरेदी करण्यात आल्या असून, त्या एप्रिल २०१६ पर्यंत स्थापन केल्या जातील.२०१६-१७ मध्ये शासनाकडून ५५.२४ कोटी अनुदान अपेक्षित आहे. परिणामी, २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात महसुली उत्पन्नाखाली 55.24कोटींची तरतूद ‘प्राथमिक शिक्षणासाठी शासनाकडून अनुदान’ या शीर्षाखाली प्रस्तावित आहे. तर माध्यमिकसाठी ५२.४७ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे.शैक्षणिक साहित्याचा मोफत पुरवठा२०१६-१७ मध्ये मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणाऱ्या २७ शालोपयोगी वस्तू शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना देण्यात येतील. याकरिता प्राथमिकसाठी ८८.१७ कोटी तर माध्यमिकसाठी १५ कोटींची तरतूद केली आहे.सर्व शाळा संगणक आणि इंटरनेटद्वारे जोडणीमहापालिकेच्या शाळा व शाळांशी संबंधित कार्यालयांकडून सांख्यिकी, तसेच अहवालात्मक माहितीचे संकलन करण्याकरिता शाळा व कार्यालये इंटरनेटद्वारे जोडण्यात येणार आहेत. यासाठी ६८ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.भगिनी शाळा महापालिकेच्या शिक्षण विभागाने ‘भगिनी शाळा’ ही नवी योजना हाती घेतली आहे. योजनेंतर्गत नामांकित शाळेतील तज्ज्ञ विषय शिक्षक आठवड्यातून दोन तास या उपक्रमासाठी देतील. शिवाय विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, इंग्रजी, तंत्रज्ञान आणि परदेशी भाषांशी मैत्री याबाबत मार्गदर्शन करतील.शालेय स्वच्छताशालेय स्वच्छता, परिरक्षण आणि सुरक्षेसाठी २०१८ सालापर्यंत खासगी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या अंतर्गत ३३८ शाळांमध्ये स्वच्छता कर्मचारी, इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर पुरवण्यात येत आहेत. यासाठी ६४.८३ कोटींची तरतूद केली आहे.जकात करामध्ये १२५० कोटींची तूट तर मालमत्ता कर वसुलीत १०० कोटी आणि विकास नियोजन खात्यात एक हजार ९१ कोटींची तूट निर्माण झाली आहे़ मात्र, राज्य शासनाने ०़३३ एफएसआय वरून ०़५० इतकी वाढ केल्यामुळे, चालू वर्षाच्या रेडी रेकनर दरानुसार अधिमूल्य वसूल करण्यात आले आहे़ यामुळे अन्य उत्पन्नामधील घट झाल्यानंतर महापालिकेच्या अर्थव्यवस्थेत पडलेला खड्डा या महसुलात काही अंशी भरून निघेल, असा विश्वास आयुक्तांना वाटतो़>> शिक्षणासाठी २ हजार ३९४.४० कोटीमुंबई : मुंबई महापालिकेचा शिक्षणासाठी २ हजार ३९४.४० कोटी रुपयांचा सन २०१६-१७ शैक्षणिक अर्थसंकल्प सादर करण्यात आला. चिक्की आणि सुगंधी दूध या दोन योजनांना अर्थसंकल्पातून वगळण्यात आले आहे. बालवाडी वर्गासाठी टॉय लायब्ररी आणि भगिनी शाळा (सिस्टर स्कूल) या दोन नव्या योजनांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला. अतिरिक्त आयुक्त पल्लवी दराडे यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षा रितू तावडे यांना बुधवारी शिक्षणाविषयक अर्थसंकल्प सादर केला.सन २०१६-१७ शैक्षणिक अर्थसंकल्पानुसार, प्राथमिक शाळांमध्ये एकूण १४ हजार ७९१ इको-फ्रेंडली बेंच आणि डेस्क पुरवण्यासाठीची खरेदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्याचा पुरवठा मार्च २०१६ पर्यंत पूर्ण होईल.महापालिकेच्या विविध शालेय इमारतींमध्ये १२६ संगणक प्रयोगशाळा निर्मितीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. ४५३ शालेय इमारतींपैकी आत्तापर्यंत २३० शालेय इमारतींची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. मार्च २०१६ पर्यंत उर्वरित १० शाळांची कामे पूर्ण होतील. (प्रतिनिधी)विज्ञान प्रयोगशाळा१०२ प्राथमिक शाळा आणि ५८ माध्यमिक शाळांमध्ये नव्याने विज्ञान प्रयोगशाळा बांधण्यात येत आहेत. यासाठी प्राथमिकसाठी ९ कोटी, माध्यमिकसाठी ६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.टेबल आणि खुर्च्याशिक्षक आणि कर्मचारी वर्गासाठी १ हजार १२५ टेबल आणि १ हजार ३१४ खुर्च्या खरेदी करण्यात येत आहेत. टेबलसाठी ९२.८२ लाख, तर खुर्च्यांसाठी ६७.२५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.शालेय इमारतीची दुरुस्ती आणि बांधणी२३ शालेय इमारतीच्या कामांसाठी निविदा मागवण्याचे काम सुरू आहे. २०१६-१७मध्ये नव्याने ३७ शालेय इमारतींचे काम हाती घेतले जाईल. उर्वरित शाळांची कामे तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने केली जातील. प्राथमिकसाठी २२७.४२ कोटींची तरतूद यात केली आहे.महापालिकेने २०१६-१७ च्या महसुली अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी २ हजार ७९२ कोटी आणि पायाभूत आरोग्य सुविधेसाठी ९०० कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. महापालिकेला आरोग्य सेवाशुल्कातून मिळणारा महसूल २४८ कोटी एवढा आहे. तो महापालिकेमार्फत आरोग्य सेवांवर खर्च होणाऱ्या रकमेच्या ६.७४ टक्के आहे. २000 साली आरोग्य सेवाशुल्क निश्चित करण्यात आले होते. मागील १५ वर्षांत या सेवा खर्चात लक्षणीय वाढ झाली आहे. या सेवेकरिता प्रत्यक्षात होणाऱ्या खर्चाची वसुली त्या प्रमाणात करणे योग्य नाही, असे गृहित धरले आहे. तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये काही अंशी सेवाशुल्क वाढविणे आवश्यक असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे मुंबई बाहेरील रुग्णांच्या सेवाशुल्कात वाढ होण्याची चिन्हे आहेत. प्रसाधनगृहेशालेय इमारतीमध्ये आधुनिक पद्धतीची टॉयलेट उभारणी करण्यात येत आहेत. यासाठी १० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.टॉय लायब्ररीमहापालिका ५०४ बालवाडी वर्ग चालवत आहे. या बालवाड्यांमध्ये प्रथमच ‘टॉय लायब्ररी’ उभारण्यात येईल. यासाठी १.७६ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.