पश्चिम रेल्वे मार्गावरील २१ विशेष गाड्यांच्या फेऱ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:07 AM2021-05-06T04:07:04+5:302021-05-06T04:07:04+5:30
लोकमत न्युज नेटवर्क मुंबई : प्रवाशांची वाढती मागणी पाहता पश्चिम रेल्वेने २१ विशेष गाड्यांच्या फेऱ्यात वाढ केली आहे. ...
लोकमत न्युज नेटवर्क
मुंबई : प्रवाशांची वाढती मागणी पाहता पश्चिम रेल्वेने २१ विशेष गाड्यांच्या फेऱ्यात वाढ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान या गाड्यांसाठी विशेष भाडे असणार आहे. विशेष गाड्यांच्या फेऱ्या १० ते १९ मेपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. केवळ आरक्षित तिकीट असणाऱ्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असून प्रवासादरम्यान त्यांनी कोरोशीसंबंधित सर्व निकषांचे पालन करणे बंधनकारक आहे.
फेऱ्यात वाढ करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमध्ये उधना- दानापूर सुपर फास्ट स्पेशल, मुंबई सेंट्रल - मंडुवाडीह, मुंबई सेंट्रल - समस्तीपूर स्पेशल, टर्मिनस - बरौनी स्पेशल, वांद्रे टर्मिनस - बरौनी स्पेशल, वांद्रे टर्मिनस - गोरखपूर, उधना - छपरा सुपरफास्ट स्पेशल, वांद्रे टर्मिनस - मऊ स्पेशल, मुंबई सेंट्रल- भागलपूर स्पेशल, वांद्रे टर्मिनस - गाजीपूर सिटी - वलसाड सुपर फास्ट स्पेशल या गाड्यांचा समावेश आहे.
सूरत - सूबेदारगंज स्पेशल, वडोदरा - दानापूर स्पेशल, वडोदरा - सूबेदारगंज स्पेशल, मुंबई सेंट्रल - भागलपूर स्पेशल, मुंबई सेंट्रल - भागलपूर स्पेशल, वांद्रे टर्मिनस - दानापूर - वडोदरा सुपरफास्ट स्पेशल, डॉ. आंबेडकर नगर - गुवाहाटी स्पेशल, अहमदाबाद - कोलकाता स्पेशल, अहमदाबाद - समस्तीपूर स्पेशल, अहमदाबाद - दानापूर, ओखा - गुवाहाटी, राजकोट - समस्तीपूर स्पेशल या गाड्यांच्या फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत.
..............................