Join us

लॉकडाऊनमध्ये सोनेतारण कर्जात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2020 11:49 PM

आजकाल कॅरेटोमीटर आल्याने सोन्याची शुद्धता मोजणे सुलभ झाले आहे.

मुंबई : कोविड-१९ लॉकडाऊनच्या काळात मे महिन्यात सुवर्णतारण कर्जात प्रचंड वाढ झाल्याची माहिती देशातील बहुतेक सुवर्णतारण कर्ज देणाऱ्या कंपन्यांनी दिली. या कंपन्यांमध्ये मणप्पुरम फायनान्स, मुथूट फायनान्स, आयआयएफएल फायनान्स, श्रीराम फायनान्स,सिटी युनियन व कोसापट्टम फायनान्स यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

आजकाल कॅरेटोमीटर आल्याने सोन्याची शुद्धता मोजणे सुलभ झाले आहे. त्यामुळे सुवर्णतारण कर्जाची रक्कम हाती येण्यास १५ मिनिटे ते ३ तास एवढाच वेळ लागतो. त्यामुळे अडचणीच्यावेळी पैसे उभे करण्याचे ते हुकमी साधन आहे. सुवर्ण कर्जावर साधारणत: १५ ते २४ टक्के वार्षिक व्याज आकारले जाते व कर्जफेडीचा कालावधी ४ ते ६ महिने एवढाच असतो. विशेष म्हणजे थकीत कर्जाचे प्रमाण १.२० ते १.५० टक्के एवढे कमी आहे.

सोन्याचे भाव २०१९ साली २८ हजार प्रति १० ग्रॅम होते. ते वाढून ४६ हजारांवर गेल्यानेही सुवर्णतारण कर्ज लोकप्रिय झाले आहे.एका अंदाजानुसार देशातील सर्व बँका व सुवर्णतारण कर्ज कंपन्यांनी मिळून २,३५,००० कोटी कर्ज वाटले असावे, अशी माहिती सूत्रांनी दिली. आजकाल कॅरेटोमीटर आल्याने सोन्याची शुद्धता मोजणे सुलभ झाले आहे. त्यामुळे सुवर्णतारण कर्जाची रक्कम हाती येण्यास१५ मिनिटे ते ३ तास एवढाच वेळ लागतो. त्यामुळे अडचणीच्यावेळी पैसे उभे करण्याचे ते हुकमी साधन आहे.

टॅग्स :सोनंमुंबई