Join us

डोकेदुखी वाढतेय, वेळीच उपचार करा !

By admin | Published: June 15, 2017 3:48 AM

पाचपैकी एका व्यक्तीला डोकेदुखी आणि व्हर्टिगोचा त्रास जाणवतो व या गोष्टीमुळे त्यांची मोठी गैरसोय होताना दिसते. या दुखण्यांमुळे जगण्याचा स्तर खालावतो

- डॉ. पवन ओझापाचपैकी एका व्यक्तीला डोकेदुखी आणि व्हर्टिगोचा त्रास जाणवतो व या गोष्टीमुळे त्यांची मोठी गैरसोय होताना दिसते. या दुखण्यांमुळे जगण्याचा स्तर खालावतो, घरी किंवा कामाच्या ठिकाणी, सामाजिक पातळीवर समरसून जगण्यावर विपरीत परिणाम होतो. या दोन्ही तक्रारी बरेचदा एकमेकांशी जोडून पाहिल्या जातात व त्यांची कारणेही समान असतात. देशातील १४.७ टक्के लोकसंख्येला डोकेदुखीचा त्रास असल्याचे आढळते तर देशातील एकूण प्रौढांपैकी ०.७ टक्के जणांना व्हर्टिगोचा त्रास आढळतो; तसेच त्यापैकी २० टक्के आजारांमागे मज्जासंस्थेशी संबंधित एखादा विकार असण्याची शक्यता असते. डोकेदुखी किंवा व्हर्टिगोचा त्रास असणारे रुग्ण बरेचदा बिगर-तज्ज्ञ डॉक्टरांकडे जातात किंवा स्वत:च उपचार करून बघतात. यामुळे विशेषज्ञांकडे पोहोचेपर्यंत रोगाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे बनते. बहुतांश वेळा, लवकरात लवकर केले गेलेले आणि अचूक निदान या दुखण्यामागील कारणे समजून घेण्यासाठी तसेच उपचाराची दिशा ठरविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. डोकेदुखीचे दुखणे हे न्यूरोलॉजिस्ट व फिजिशियन्स यांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने हाताळले जाते.डोकेदुखीच्या उपचारामध्ये औषधे, हालचाली, पूरक औषधे, समुपदेशन व रुग्णाचे प्रशिक्षण या गोष्टींचा अंतर्भाव होतो. चिकित्सात्मक उपचार हे रुग्णासाठी सुरक्षित असल्याचे आढळून आले तर त्याचा विचार केला जावा. विजेचा आघात झाल्यासारखी तीव्र आणि अचानक सुरू झालेली डोकेदुखी, डोकेदुखीच्या जोडीला ताप, मान अवघडणे, विचारांमध्ये गोंधळ, आकडी येणे, दोन प्रतिमा दिसणे, अशक्तपणा, बधिरपणा किंवा बोलायला त्रास होणे अशी लक्षणे दिसल्यास डोक्याला मार बसल्यानंतर सुरू झालेली डोकेदुखी, विशेषत: अशा डोकेदुखीची तीव्रता वाढती असल्यास, खोकणे, शरीर ताणणे किंवा झटपट हालचाल केल्यामुळे वाढणारी तीव्र डोकेदुखी यांपैकी कोणतेही लक्षण किंवा चिन्हे आढळल्यास त्वरित डॉक्टरांची भेट घ्या किंवा आपत्कालीन विभागामध्ये जा. ही लक्षणे अधिक गंभीर अशा वैद्यकीय परिस्थितीमुळे उद्भवलेली असू शकतात.डोकेदुखीचे प्रकारमाध्यमिक गटातील डोकेदुखी : अशा प्रकारच्या डोकेदुखीमागे सायनससारखे दुसरे एखादे कारण असते. प्राथमिक गटात येणाऱ्या अर्धशिशिसारख्या दुखण्यांपासून हे दुखणे वेगळे असल्याने त्यासाठी हा गट बनविण्यात आला आहे.प्राथमिक स्वरूपाची डोकेदुखी : यात डोकेदुखी हेच खरे दुखणे असते व त्यामागे दुसरे कोणतेही कारण नसते. प्राथमिक स्वरूपाच्या डोकेदुखीचे तीन मुख्य प्रकार म्हणजे : अर्धशिशी (मायग्रेन), तणाव व क्लस्टर डोकेदुखीमज्जारज्जूशी संबंधित वेदनामय क्रॅनिअल न्यूरोपॅथिस किंवी चेहऱ्याला जाणवणाऱ्या इतर वेदना : या प्रकारामध्ये चेहरा, मान व डोक्यामध्ये तीव्र स्वरूपाची, टोचणारी कळ उठते.