मुंबई - राज्यातील कोतवालांच्या मासिक मानधनात वाढ करण्याचा, चतुर्थश्रेणी सरळसेवेच्या पदांमध्ये शिपाई म्हणून त्यांचा कोटा वाढविण्याचा आणि त्यांना राज्य शासकीय कर्मचारी समूह वैयक्तिक अपघात योजना, अटल निवृत्तीवेतन योजना व महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ देण्यासंबंधीचा आदेश राज्य शासनाने बुधवारी काढला.महसूल विभागांतर्गत असणाऱ्या गट ड च्या प्रथम नियुक्तीच्या पदांपैकी नियमित पदांमधून ४० टक्के पदे कोतवालांसाठी राखीव असतील. त्यासाठी सेवाप्रवेश नियमांमध्ये आवश्यक ती सुधारणा केली जाईल.आधी २५ टक्के पदे राखीव असायची.जे कोतवाल वर्ग ड च्या सदर कोट्यातील पदोन्नतीस पात्र ठरतील त्यांना सदर पदावर नियुक्ती होईपर्यंत दरमहा १५ हजार रुपये इतके मानधन मिळेल. या निर्णयाचा फायदा राज्यातील १२ हजार ९०० कोतवालांना होणार आहे.अटल योजना अन् महात्मा फुले योजनेचा मिळणार लाभकोतवालांच्या मागण्यांसंदर्भात राज्य शासनाने दिलेला शब्द आज खरा केला आहे. महसूल विभागात महत्त्वाची भूमिका असलेले कोतवाल बांधव आता अधिक चांगली सेवा देतील हा विश्वास आहे.- चंद्रकांत पाटील,महसूल मंत्री.कोतवालांच्या मानधनात वाढ करताना राज्य शासनाने त्यांना चतुर्थश्रेणी कर्मचा-याचा दर्जादेखील द्यायला हवा होता. सहाव्या वेतन आयोगाने त्यांना १४ हजार रुपये मानधन देण्याची शिफारस केली होती पण तसे झाले नाही.- भाऊसाहेब पठाण,अध्यक्ष, चतुर्थश्रेणी मध्यवर्ती कर्मचारी संघटना
कोतवालांच्या मानधनात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 6:04 AM