रुग्णालयातील उपचारांच्या शुल्कात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:56 AM2018-01-17T01:56:13+5:302018-01-17T01:56:21+5:30

पालिका रूग्णालयांवरील ताण व खर्च वाढत असल्याने उपचार शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली.

Increase in Hospital Cure Charge | रुग्णालयातील उपचारांच्या शुल्कात वाढ

रुग्णालयातील उपचारांच्या शुल्कात वाढ

Next

मुंबई : पालिका रूग्णालयांवरील ताण व खर्च वाढत असल्याने उपचार शुल्कात वाढ करण्याच्या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीत मंगळवारी मंजुरी देण्यात आली. दोन वर्षांपूर्वी प्रशासनाने आणलेला शुल्क वाढीचा प्रस्ताव महापालिका निवडणुकीच्या काळात लांबणीवर पडला होता. मात्र, मुंबई बाहेरील रुग्णांसाठी ३० टक्के, तर मुंबईतील रूग्णांसाठी २० टक्के शुल्क वाढ मंजूर करण्यात आली आहे. जेष्ठ नागरिकांना मात्र मोफत उपचार मिळणार आहेत.
पालिकेच्या केईएम, नायर आणि लोकमान्य टिळक या तीन रुग्णालयांवर पालिका दरवर्षी सरासरी ६०० ते ७०० कोटी रुपये खर्च करते. त्यापैकी यातून दहा टक्के उत्पन्नही पालिकेला मिळत नाही. २००२ मध्ये पालिकेने उपचार शुल्कात वाढ केली होती. उत्तपन्नाचे प्रमुख स्त्रोत असलेला जकात कर बंद झाल्याने दर्जेदार आरोग्यसेवेसाठी निधी उभा राहणे आवश्यक आहे. यासाठी पालिका प्रशासनाने जून २०१६ मध्ये रुग्ण सेवेच्या शुल्कात ७५ ते १०० टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव मांडला होता. तसेच मुंबई बाहेरील नागरिकांना अतिरीक्त २० टक्के शुल्क आकारण्याची शिफारस करण्यात आली होती.
मात्र, निवडणुकीच्या काळात हा प्रस्ताव लांबणीवर टाकण्यात आला. यामध्ये आता सुधारणा करीत मुंबईतील नागरिकांना २० टक्के, तर मुंबई बाहेरील नागरिकांच्या उपचार शुल्कात ३० टक्के वाढ करण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. पालिकेच्या सर्व रुग्णालयात आतापर्यंत जेष्ठ नागरिकांना निम्या शुल्कात उपचार मिळत होते. यापुढे मोफत उपचार देण्याच्या अटीवरच गटनेत्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली. महासभेच्या मंजुरीनंतर नवीन दर लागू होतील.

असे काही शुल्क (रुपयांत )
वैद्यकिय सेवा सध्याचे मुंबईतील मुंबई बाहेरील
दर नागरिकांसाठी नागरिकांसाठी
अतिविशेष शस्त्रक्रिया ५000 ६000 ६५00
विशेष शस्त्रक्रिया ५०० ६०० ६५०
किरकोळ शस्त्रक्रिया २०० २४० २६०
प्रसुती (दुसºया मुलानंतर) ५०० ६०० ६५०
एमआरआय २५00 ३000 ३२५0
अल्ट्रा सोनोग्राफी १०० १२० १३०
थायरॉईड १०० १५० 00
कलर डॉपलर ५०० ६०० ६५०

Web Title: Increase in Hospital Cure Charge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.