मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या(Defamation) तक्रारीवर येथील स्थानिक न्यायालयाने गुरुवारी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावले आहे. शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने राऊत यांना ४ जुलै रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.एखाद्या व्यक्तीने नोंदवलेल्या खाजगी तक्रारीच्या आधारे महानगर किंवा न्यायदंडाधिकार्यांसमोर फौजदारी कारवाईची सुरुवात म्हणजेच समन्स जारी केले जाते. समन्स जारी झाल्यानंतर, आरोपी व्यक्तीला न्यायालयात हजर राहावे लागते.
महाराष्ट्रात शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात न्यायालयात मानहानीची तक्रार दाखल केली होती. संजय राऊत यांनी 100 कोटींच्या शौचालय घोटाळ्यात गुंतल्याचा आरोप केला आहे. शिवडी मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल केलेल्या तक्रारीत मेधा यांनी संजय राऊत यांनी गेल्या महिन्यात केलेले आरोप निराधार आणि बदनामीकारक असल्याचे म्हटले होते.
मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या हद्दीत सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या बांधकामात 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. माध्यमांसमोर केलेले वक्तव्य बदनामीकारक असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले. माझी प्रतिमा खराब करण्यासाठी ही विधाने करण्यात आली आहेत. मेधा सोमय्या यांनी यासंदर्भात संजय राऊत यांना नोटीस बजावण्याची विनंती केली. संजय राऊत यांच्यावर मानहानीची कारवाई करण्याची मागणी केली.