राज्यात जेएन १ कोविड व्हेरिएंट रुग्णांमध्ये वाढ; रुग्णांची एकूण नोंद ६६२ एवढी झाली

By स्नेहा मोरे | Published: January 31, 2024 11:56 PM2024-01-31T23:56:11+5:302024-01-31T23:56:18+5:30

राज्यातील जेएन.१ व्हेरिएंट रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता ती २५१ वरुन थेट ६६२ वर पोहचली आहे.  

Increase in JN1 Covid Variant Patients in State; The total number of patients was 662 | राज्यात जेएन १ कोविड व्हेरिएंट रुग्णांमध्ये वाढ; रुग्णांची एकूण नोंद ६६२ एवढी झाली

राज्यात जेएन १ कोविड व्हेरिएंट रुग्णांमध्ये वाढ; रुग्णांची एकूण नोंद ६६२ एवढी झाली

मुंबई - राज्यातील जेएन.१ व्हेरिएंट रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता ती २५१ वरुन थेट ६६२ वर पोहचली आहे.  बुधवार पर्यंत ४५१ जेएन.१ व्हेरिएंट रुग्णांची नोंद होती,आता राज्यात जेएन.१ व्हेरिएंट रुग्णांची एकूण नोंद ६६२ एवढी झाली आहे. सौम्य लक्षणांचा मानला जाणाऱ्या या रुग्णांची संख्या मात्र एकाच वेळी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

दरम्यान बुधवारी राज्यातील जेएन.१ व्हेरिएंट रुग्णसंख्या जिल्हा निहाय पाहिल्यास पुणे जिल्हा पहिल्या क्रमांकावर असून पुणे ३२७, ठाणे ८८, नागपूर ५५, छ. संभाजीनगर ५४, मुंबई ३६, अमरावती १८, रायगड १४, सोलापूर १३, कोल्हापूर ११, सांगली ७, रत्नागिरी आणि जळगाव अनुक्रमे ५, अहमदनगर, बीड तसेच चंद्रपूर प्रत्येकी ३, तर अकोला, गडचिरोली, जालना, नांदेड, नाशिक आणि धाराशिव प्रत्येकी २, तसेच नंदूरबार, सातारा, सिंधुदूर्ग, आणि यवतमाळ या जिल्ह्यात प्रत्येकी १ अशी नोंद झाली आहे. सौम्य लक्षणांचा आणि घरीच उपचार घेऊन बरे हेत असलेले रुग्ण आहेत असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र सौम्य लक्षणे असली तरीही यापासून कोविड वर्तवणुकीचे  पालन केल्यास प्रतिबंध बसू शकतो असेही तज्ज्ञ सांगत आहेत.  

राज्यात एक कोविड मृत्यू , २१६ सक्रिय रुग्ण

दरम्यान राज्यात बुधवारी एक कोविड मृत्यू नोंद करण्यात आला आहे.  यापूर्वी मागच्या गुरुवारी एका मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.८१ टक्के एवढा आहे. दरम्यान बुधवारी राज्यात ४५ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर मुंबईत १० रुग्णांची नोंद करण्यात आली. तसेच राज्यात बुधवारी एकूण  २१६ सक्रिय रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. तसेच ५६ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१८ टक्के एवढे झाले आहे. तर राज्यात बुधवारी ९४२१ चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी ११९८ आरटीपीसीआर चाचणी, तर ८२२३ आरएटी चाचण्यांची नोंद प्रयोगशाळेत झालेली आहे. आजचा पॉझिटिव्हीटी दर ०.४७ टक्के एवढा आहे.

गृह विलीगीकरणात असलेले रुग्ण : २११(९२.५ टक्के)
रुग्णालयात दाखल असलेले रुग्णः १७ (७.५टक्के)
आयसीयूमध्ये नसलेले रुग्णः १२ (५.३ टक्के)
आयसीयूमध्ये असलेले रुग्णः ०५ (२.२ टक्के)

 

Web Title: Increase in JN1 Covid Variant Patients in State; The total number of patients was 662

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.