Join us  

मुंबई विभागात अवयवदानात वाढ 

By संतोष आंधळे | Published: October 25, 2023 9:58 PM

Mumbai: गेल्या काही वर्षात अवयदान या विषयावर मोठ्या पद्धतीने जनजगृती केली जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना अवयवदानच्या संख्येत भर पडत आहे.

- संतोष आंधळे मुंबई-  गेल्या काही वर्षात अवयदान या विषयावर मोठ्या पद्धतीने जनजगृती केली जात आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना अवयवदानच्या संख्येत भर पडत आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत मुंबई विभागीय प्रत्यारोपण समितीमध्ये ३० मेंदूमृत अवयवदात्यांनी अवयदान केले होते. तर याच कालावधीत या वर्षी ३८ अवयवदात्यांनी अवयवदान केले आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाढ दिसून आल्याचे मुंबई विभागीय प्रत्यारोपण समितीने सांगितले आहे. 

गेल्या वर्षी ३० अवयदात्यांनी केलेल्या अवयवदानामुळे ८१ अवयव मिळाले होते. तर या वर्षी ३८ अवयदात्यांनी केलेल्या अवयवदानामुळे १०९ अवयव मिळाले  आहे. अजून या वर्षातील दोन महिने बाकी आहे. अवयवदानाच्या जनजागृतीसाठी शासकीय आणि सामाजिक स्तरावर  मोठ्या प्रमाणात जनजगृती केली जाते.

अवयव दान झाल्यानंतर त्याच्या नियमनावर काम करण्यासाठी चार विभागीय समिती काम करत आहेत. त्यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि  नागपूर या चार शहरांचा समावेश आहे. यामध्ये गेली काही वर्ष मुंबई विभागीय समितीच्या कार्यकक्षेत इतर समित्यांपेक्षा अधिक अवयवदाते अवयव दान करत असतात.

राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे. एका वर्षाला मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे.

जानेवारी ते सप्टेंबरमधील आकडेवारी २०२२ अवयवदाते - ३०किती अवयव मिळाले  - ८१

२०२३ अवयवदाते - ३८किती अवयव मिळाले  -१०९

६६ वर्षांच्या जेष्ठांचे अवयवदानमुलुंड येथील येथील फोर्टिस रुग्णालयात सोमवारी ६६ वर्षांच्या जेष्ठ नागरिकाचा मेंदूमृत झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्यामुळे अवयवांच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तीन रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. या अवयवदानातून यकृत  किडनी आणि डोळे  दान केले गेले. हे मुंबई शहरातील या वर्षातील ३८ वे अवयव दान आहे.

टॅग्स :अवयव दानमुंबई