Join us

सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 3:21 PM

मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच-उपसरपंचांचे वेतन वाढवण्यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.

Cabinet Meeting ( Marathi News ) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यास अवघे काही दिवस बाकी असताना होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत नेमके काय निर्णय घेण्यात येणार, याबाबत उत्सुकता होती. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत सरपंच-उपसरपंचांचे वेतन वाढवण्यासह अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

राज्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या वेतनात दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. तसंच ग्रामसेवकपदाचं नाव बदलून ग्रामविकास अधिकारी असं करण्यात आलं असल्याचंही मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत जळगाव जिल्ह्यातील विकासकामांनाही गती देण्यात आल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली असून जळगावमध्ये क्रीडा संकुलाला मंजुरी देण्यात आली असल्याचं ते म्हणाले. या क्रीडा संकुलासाठी राज्य सरकारकडून अडीचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

टॅग्स :राज्य सरकारसरपंचग्राम पंचायत