Join us  

मूर्तींच्या किमतीत २ हजार रुपयांनी वाढ?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 1:23 PM

महागाईमुळे मूर्तीच्या किमतीत दोन हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 

मुंबई :  मुंबई शहर आणि उपनगरात आजघडीला लहान आणि मोठ्या अशा मूर्ती कार्यशाळांची संख्या सुमारे दोन हजार आहे. हा आकडा त्यापेक्षा देखील अधिक असू शकतो. धारावी किंवा मुंबईतल्या अनेक परिसरात घरात देखील मूर्ती तयार करण्याचे काम केले जाते. महागाईमुळे मूर्तीच्या किमतीत दोन हजार रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. 

मुंबई शहर आणि उपनगरातील काही सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ पेण येथून देखील देवीच्या मूर्ती आणतात. मात्र तुलनेने ही संख्या कमी आहे. बहुतांश मूर्ती या मुंबईत तयार केल्या जातात. महागाईचा जमाना आहे. दिवसागणिक महागाई वाढत आहे. जशी प्रत्येक वस्तूची किंमत वाढते तशी मूर्तीची किंमत देखील वाढत असते. मूर्ती तयार करण्यासाठी जे साहित्य लागते त्या साहित्याची किंमत प्रत्येक वर्षी वाढत असते. हा खर्च भागवून काढण्यासाठी देवीच्या मूर्तीची किंमत देखील वाढवावी लागते. देवीच्या मूर्तीची किंमत दरवर्षी कमीत कमी दोन हजार रुपयांनी वाढते. मात्र हा आकडा प्रत्येक मूर्ती प्रमाणे वेगळा असतो.

माझे संपूर्ण कुटुंब मूर्ती बनविण्यासाठीच्या कामात व्यस्त असते. मी स्वतः कार्यशाळेत दिवसभर असतो. शिवाय कारागीर असतात. माझी पत्नी मला मदत करते. वर्षातले चार महिने आम्ही हे काम करतो. शिवाय गणेशोत्सवाचे काम असते. दिवाळीमध्ये पणत्या रंगवण्याचे काम असते. हे काम सोपे जरी वाटत असले तरी यात खूप आव्हाने आहेत. खूप कष्ट करावे लागतात. महापालिकेपासून संघटनांसोबत विविध विषयांवर चर्चा करावी लागते. मार्गदर्शन घ्यावे लागते. मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करावी लागते. सगळ्यांना सोबत घेऊन ही कामे करावी लागतात. या कामाचे पैसे मिळत असले तरी या कामामुळे समाधान मिळते ही सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बाब आहे.- रोहन कांबळे, मूर्तिकार

टॅग्स :नवरात्रीमहागाई