अचूक ‘वेध’शाळा, पाऊस फर्स्ट क्लास! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील जलसाठ्यांत वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 09:35 AM2024-07-16T09:35:09+5:302024-07-16T09:36:43+5:30

गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे.

increase in water storage in lakes supplying water to mumbai rain forecast predicted by the imd become true | अचूक ‘वेध’शाळा, पाऊस फर्स्ट क्लास! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील जलसाठ्यांत वाढ 

अचूक ‘वेध’शाळा, पाऊस फर्स्ट क्लास! मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील जलसाठ्यांत वाढ 

मुंबई :  गेल्या काही दिवसांपासून उत्तर आणि दक्षिण कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद होत आहे. विशेष म्हणजे वेधशाळेने वर्तवलेले पावसाचे सर्व अंदाज तंतोतंत खरे ठरत आहेत. मुंबईत पडलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई आणि परिसराला पाणीपुरवठा करणारे तलावही आता हळूहळू भरत असून,   त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता लवकरच मिटणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात पावसाचा जाेर पाहायला मिळाला. १७ जुलै रोजी दक्षिण मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. १८ आणि १९ जुलै रोजी तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. विशेषत: १९ जुलै रोजी कदाचित पावसाचा आकडा २०० मिमी पार जाईल. त्यामुळे सखल भागात पावसाचे पाणी साचण्याचा धोका आहे. मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत ठाणे, नवी मुंबई परिसरात ३०० ते ४०० मिमीपेक्षा अधिक पाऊस पडू शकतो, अशी माहिती हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी दिली. पावसाचा जोर वाढणार असल्याने मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

जुलै महिन्यातच १ हजाराचा टप्पा पार-

१)  मुंबईत झालेला एकूण पाऊस ४५.४४ टक्के

२)  जुलै महिन्याच्या मध्यातच पावसाने १ हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. सांताक्रूझ आणि कुलाबा या दोन्ही वेधशाळांत पावसाने १ हजार मिमीची नोंद केली आहे.

आतापर्यंतचा जुलैचा पाऊस ८५६ मिमी- 

१) पनवेल ९२७ मिमी

२)कोपरखैरणे ८५६ मिमी

३) वसई ७७६ मिमी

४) ठाणे ७०४ मिमी

५) पालघर ५७० मिमी

६) पवई १४०३ मिमी

७) चेंबूर ७०८ मिमी

८) सांताक्रूझ ८६७ मिमी

९) सायन १२७४ मिमी

१०) परळ १०१८ मिमी

११) कुलाबा ६६३ मिमी 

भारतीय हवामान शास्त्र विभाग आणि मुंबई महापालिकेकडून प्राप्त आकडेवारीनुसार जून आणि जुलै महिन्यातील पाऊस हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी नोंदवला आहे.

१४ जुलैपर्यंतचा पाऊस- शहर आणि उपनगरातील सरासरी पाऊस

१) शहर ४८.१८ टक्के

२) उपनगर ४२.३७ टक्के

Web Title: increase in water storage in lakes supplying water to mumbai rain forecast predicted by the imd become true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.